1. बातम्या

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला, ऊसदर आंदोलन पेटले..

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यभर दौरे करत आहेत. ऊस उत्पादक अडचणीत आला असून त्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी ते मोर्चे काढत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugar factory

sugar factory

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यभर दौरे करत आहेत. ऊस उत्पादक अडचणीत आला असून त्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी ते मोर्चे काढत आहेत.

यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कारखाने बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. आता सातारा जिल्ह्यात ऊस दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटलं आहे. इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री पेटवला. यामुळे वातावरण तापले आहे.

जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. यामुळे हा प्रश्न कधी निकाली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने हे शेजारील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा कमी दर देत आहेत, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा, कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय

राज्यातील साखर कारखान्याकडून होत असलेल्या काटामारीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. यावेळी या मोर्चाची दखल घेवून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खाजगी वजन काटे वैद्यामापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित केले असल्याने खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्याचे परिपत्रक काढले आहे.

राजू शेट्टींनी रस्ता केला आणि 2 कॅन दुधाचे झाले 16 कॅन दूध, गावकऱ्यांच्या वैभवात पडणार भर

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. तसेच विनापावती साखरेची विक्री करून सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या जीएसटीलाही चुना लावतात. याबाबत शासनाने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशेबी साखर किती आहे तपासावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली
उस दरासाठी आता दिवसेंदिवस शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत
शेतकऱ्यांनो शेअर्सवरील साखरेच्या मोहापाई हजारो रुपयांचे नुकसान का करुन घेता?

English Summary: tractor full sugarcane was set on fire the protestors. Published on: 17 November 2022, 04:45 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters