1. बातम्या

ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Sugarcane transport

Sugarcane transport

सध्या ऊस गळीत हंगाम सुरू होत असून अनेक कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच ऊस तोड केल्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोडावत फॅक्टरीची ऊस वाहतूक थांबवली आहे.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरची हवा सोडून दिली आहे. ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू नये, असा इशारा देत ऊस तोड बंद पाडली आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आळते (ता. हातकंणगले) येथे कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे. यामुळे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत, नवरात्रीपूर्वीच फुलांची मागणी वाढली, शेतकरी समाधानी

या परिषदेत शेट्टी यांनी अधिकच्या एफआरपीची मागणी केल्यास संघर्ष नाकारता येत नाही. गेल्या हंगामात शंभर टक्के एफआरपी देण्यात कोल्हापूर आघाडीवर आहे. गेली दोन वर्षे कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यात एफआरपी दोन-तीन टप्प्यात दिली जाते.

लंम्पी रोग आता हायकोर्टात, राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली दाखल

दरम्यान, नियोजित ऊस परिषदेवर राजू शेट्टी ठाम असून ते काय भूमिका घेतात ते औत्सुक्याचे असेल. यावेळी महागाई वाढल्यामुळे शेतकरी संघटना जास्तीच्या रकमेची मागणी करत आहेत. महागाईमुळे शेती करणे अवघड झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:
भाजप नेत्याला मोठा धक्का! 28 वर्षांनंतर साखर कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो बोगस खते कशी ओळखायची? वाचा साधी सोप्पी पद्धत
दुबईमधील लाखो रुपयांची नोकरी सोडून केली स्ट्रॉबेरीची शेती, आज कमवतोय लाखो, एकाच पिकात घेतली तीन पिके..

English Summary: Breaking! Sugarcane price agitation ignited, farmers' association stopped traffic Published on: 26 September 2022, 05:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters