राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मंत्रालयामध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांची बैठक घेऊन कारखान्याच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून कारखान्यावर अनेक अडचणी येत आहेत. यामुळे आता किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आर्थिक परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
कारखान्यात विजय मिळताच खऱ्या जबाबदारीला सुरुवात झाल्याने आमदार मकरंद पाटील यांनी त्या पद्धतीने हालचाल सुरू केली आहे. मकरंद पाटील व नितीन पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यामध्ये कारखान्याची मूळ थकीत रक्कम, थकीत देणी, बंद पडलेल्या प्रकल्पांची परिस्थिती, गाळप हंगाम तसेच खंडाळा सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाना यांच्यासाठी झालेला खर्च याची माहिती जाणून घेतली.
तसेच अतिरिक्त देणी आणि लागू झालेले व्याज याची सविस्तर मांडणी या बैठकीत करण्यात आली. राज्य शासनाने राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून किसन वीर कारखान्याच्या आर्थिक देणी देण्याकरिता मदत करावी, अशी मागणी संचालक मंडळाच्यावतीने आमदार मकरंद पाटील व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पवारांकडे केली, यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी सव्वा तास झालेल्या या बैठकीमध्ये दादांनी किसन वीर कारखान्याच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या. राज्य शासनाने सहकार क्षेत्रातील शिखर बॅंक असणाऱ्या राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक देण्याकरिता मदत करावी तसेच 52 हजार शेतकऱ्यांची मालकी कारखान्यावर कायम राहावी या दोन महत्वाच्या मागण्या या बैठकीमध्ये करण्यात आल्या.
यावेळी राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून कर्जफेडीकरता कोणती सकारात्मक पावले उचलता येतील याची लवकरच चर्चा करून योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत किसनवीर सहकारी साखर कारखान्यातील माजी आमदार मदन भोसले यांची सत्ता आमदार मकरंद पाटील यांनी उलथवून टाकली.
महत्वाच्या बातम्या;
CNG GAS; सीएनजीच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, लवकरच गाठणार शंभरी?
दुग्ध व्यवसायासह पशुधन देखील अडचणीत; आता शेतकरी आणखी खोलात
गाय आणि म्हशीच्या कानातील 'आधार कार्ड' टॅगमुळे शेतकऱ्यांचा फायदा! मिळतो 'या' योजनांचा फायदा..
Share your comments