1. बातम्या

Agri News: यावर्षी पणन महासंघ फक्त सुरू करणार 50 कापूस खरेदी केंद्रे, वाचा सविस्तर

यावर्षी आपण कापूस उत्पादनाचा एकंदरीत विचार केला तर झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात काहीशी घट येईल असा एक प्रकारचा अंदाज दिसतो. परंतु मागच्या वर्षी कापसाला खाजगी बाजारामध्ये चांगले दर मिळाले होते व तशीच परिस्थिती यावर्षी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन महासंघाकडे कापूस येण्याची शक्यता कमी असल्यामुळे तसेच गेल्या दोन वर्षाचा विचार केला अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी जी काही ओढाताण झाली होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cotton crop update

cotton crop update

यावर्षी आपण कापूस उत्पादनाचा एकंदरीत विचार केला तर झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात काहीशी घट येईल असा एक प्रकारचा अंदाज दिसतो. परंतु मागच्या वर्षी कापसाला खाजगी बाजारामध्ये चांगले दर मिळाले होते व तशीच परिस्थिती यावर्षी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन महासंघाकडे कापूस  येण्याची शक्यता कमी असल्यामुळे  तसेच गेल्या दोन वर्षाचा विचार केला अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी जी काही ओढाताण झाली होती.

नक्की वाचा:Cotton Farming: कापूस उत्पादकांचे टेन्शन वाढले! पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत; उत्पादनात होणार मोठी घट

 या सगळ्या पार्श्वभूमीमुळे पणन महासंघाने एक नियोजन म्हणून या वर्षी केवळ 50 केंद्र सुरू करण्याचा ठराव घेतला असून त्यासंबंधीचे पत्रदेखील शासनाला पाठवले असून आता शासन या बाबतीत काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

जर आपण गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या हंगामाचा विचार केला तर सीसीआय व पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर कापसाची चांगल्या प्रमाणात विक्री करण्यात आली होती. यावर्षी खासगी बाजारात भाव चांगले आहेत व याचा परिणाम पणन महासंघाकडे कापूस कमी राहण्यावर राहण्याची शक्यता आहे.  परंतु वेळेवर धावपळ नको म्हणून नियोजन म्हणून पनण महासंघाने 50 केंद्र उघडण्याची तयारी दर्शवली आहे.

नक्की वाचा:दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर

या वर्षाची आपण कापूस उत्पादनाची परिस्थिती पाहिली तर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाला फटका बसला असून उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. अगदी दिवाळी तोंडावर आली असून देखील अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस नाही. अजून पर्यंत पणन महासंघाची केंद्र सुरू झालेली नाहीत व सीसीआयची देखील खरेदी बंद आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये पणन खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता असून त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु खरेदी केंद्र उघडण्याची वाट शेतकरी पाहत आहेत.

शेतकऱ्यांना एक आधार म्हणून  कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार असून सीसीआय किती केंद्रे उघडणाऱ्या बाबदेखील स्पष्टता नसल्यामुळे सीसीआयची देखील खरेदी केंद्रांची संख्या घटण्याची एक शक्यता आहे.

नक्की वाचा:लिचीची शेती करून कमवू शकता बक्कळ पैसा, जाणून घ्या लीची शेतीचे व्यवस्थापन आणि लागवड

English Summary: this current year cotton fedration statr only 50 cotton purchase center in maharshtra Published on: 04 October 2022, 09:53 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters