1. बातम्या

लिचीची शेती करून कमवू शकता बक्कळ पैसा, जाणून घ्या लीची शेतीचे व्यवस्थापन आणि लागवड.

भारत हा एक कृषिप्रधान देश म्हणून साऱ्या जगभर चर्चेत आहे. तसेच देश काही पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर सुद्धा आहे. बहुतांशी भारतीय लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. सध्या शेती आणि तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे

भारत हा एक कृषिप्रधान देश म्हणून साऱ्या जगभर चर्चेत आहे. तसेच देश काही पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर सुद्धा आहे. बहुतांशी भारतीय लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. सध्या शेती आणि तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत.

 

सध्या च्या युगात विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या जोरावर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागल्या आहेत तसेच तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग यामुळे शेतीमधील कामे अगदी सहजपणे होऊ लागली आहेत शिवाय आधुनिक बियाणांचा वापर केल्यामुळे कमी वेळात अधिक उत्पन्न शेतीमधून मिळत आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या जोरावर शेतकरी वर्ग शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे शिवाय पीक पद्धती मध्ये झालेला बदल यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढू लागले आहे. सध्या तरुण शेतकरी वर्ग शेतांमध्ये नवीन विविध पिकांची लागवड करून लाखो रुपये कमवत आहेत.

हेही वाचा:-बाप रे! सोलार ड्रायरचा होतोय शेतमाल वाळविण्यासाठी फायदा, जाणून घ्या कशा प्रकारे बनवायचे यंत्र

 

भारतातील शेतकरी वर्गाचा लिची या फळबाग शेतीकडे कल:-
लिची हे प्रामुख्याने एक चायनीज वंशाचे फळं आहे. प्रामुख्याने हे फळ उष्कटिबंधीय भागात येते. शिवाय सध्या चीन बरोबरच या फळांचे उत्पन नेपाळ, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण तैवान, उत्तर व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, फिलीपिन्स आणि दक्षिण आफ्रिका या वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा घेतले जात आहे. लिची हे चीन चे फळ असेल तरी आज जागतिक स्तरावर उत्पादनात चीननंतर भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे

भारतातील या राज्यात होते लिची लागवड:-
आपल्या देशात पहिल्यांदा लिची फळाची लागवड जम्मू आणि काश्मीर येथे केली होती त्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यात सुद्धा लिची ची लागवड होऊ लागली.सध्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तरांचल, आसाम आणि त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सुद्धा लीचीची लागवड केली जाते.

हेही वाचा:-तुमची किडनी योग्यरीत्या काम करतेय का नाही घ्या जाणून, तसंच किडनी फेल होण्याचे संकेत सुद्धा भेटतील

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी:-
लिची या फळाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. लिची हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे बाजारात या फळाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. लिची मध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. लिची मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, नियासिन, रिबोफ्लेविन, फोलेट, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखी खनिजे आढळतात म्हणून बाजारात लीचीला प्रचंड प्रमाणात मागणी आहे.

सुधारित जाती:-

लिचीच्या सुधारित जातींमध्ये शाही, त्रिकोलिया, अळौली, ग्रीन, देशी, रोझ सेंटेड, डी-रोज, अर्ली बेदाणा, स्वर्ण, चायना, इस्टर्न, कसबा या जातींचा समावेश होतो.


लागवड आणि व्यवस्थापन:-
लिची ची लागवड करण्यासाठी 5 ते 7 पी एच असलेल्या वालुकामय मातीमध्ये लिची ची लागवड करावी. तसेच पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये लीचिची लागवड करावी. तसेच लिचीच्या उत्पादनासाठी समशीतोष्ण हवामान अधिक पोषक असते. लिची ची लागवड ही प्रामुख्याने जानेवारी ते फेब्रवारीच्या महिन्यात करावी.

English Summary: You can earn good money by farming lychee, know management and cultivation of lychee farm. Published on: 02 October 2022, 09:56 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters