शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शेतात लागणाऱ्या अनेक वस्तू, खत याचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र यामध्ये कपात करण्यात आली आहे. तरी देखील आता नांगरटीचे दर हे वाढवण्यात आले आहेत.
मान्सूनपूर्ण पावसामुळे शेतजमिनीत थोडा ओलसरपणा आला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. असे असताना त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यात ट्रॅक्टर भाडे प्रतितास ९०० रुपये घेतले जात असून गतवर्षीपेक्षा १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
काहीजण ९०० पेक्षा जास्तीचे पैसे घेत आहेत. पावसाळा सध्या सुरू होत आहे. यामुळे सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. सध्याच्या काळात शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने करत आहेत. यामुळे कामे लवकर होत असली तरी याचा आर्थिक बजेटवर परिणाम होत आहे.
'साखर निर्यात बंदीचा निर्णय मुर्खपणाचा, दिल्लीत अति शहाण्या लोकांनी याचा विचार करून निर्णय घ्यावा'
सध्या ट्रॅक्टर गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरुपात रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाला असला तरी अधिकचे पैसे खर्च होत आहे. यामुळे हे दर कमी करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
जुन्नरच्या हापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! GI मानांकनाबाबत शरद पवारांकडून आश्वासन
अनेक शेतकरी हे दरवर्षी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते, मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी- बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेतजमीन करण्यास शेतकरी टाळत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या;
साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, प्रत्येकाच्या खात्यावर आहेत १५ लाख रुपये, वाचा श्रीमंतीचे कारण...
सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत
Share your comments