कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार

02 January 2019 08:27 AM


मुंबई:
राज्यातील कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करुन कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पणनमंत्री श्री. देशमुख म्हणाले, शासन राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांद्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. काही बाजार समित्या शेतमालाचे दर उतरावेत म्हणून बाजार समित्या बंद ठेवत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी जर बाजार समित्या बंद ठेवत असतील, तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खळ्यावर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च घेऊ नये, असेही पणनमंत्री श्री. देशमुख यांनी बैठकीत सांगितले.

कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, मार्च 2018 पर्यंत सरसकट कर्जमाफी करुन येणाऱ्या हंगामासाठी शून्य टक्के व्याजदराने सुलभ पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, दुष्काळाबाबत तातडीने मदत शेतकऱ्यांना करावी. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 हा अनुदान जाहीर केलेला कालावधी रद्द करुन 1 नोव्हेंबर ते 31 मार्च 2019 पर्यंत कांद्यास अनुदान जाहीर करावे. उन्हाळी कांदा खरेदीसाठी शासनाने हस्तक्षेप करावा आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

कांदा subhash deshmukh onion MSP हमीभाव सुभाष देशमुख अनुदान subsidy
English Summary: The proposal will be sent to the Center to give a minimum support price to Onion

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.