शेतकरी शेतात अमाप कष्ट घेत असतो. बदल्यात आपल्या कष्टाचे चीज व्हावे हीच इच्छा असते. मात्र बऱ्याचदा अवकाळी पाऊस, वादळी वारे, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागत असते. मात्र इथे माणूसच शेतकऱ्याचे कष्ट जाणून घेत नाहीये असं दिसत आहे. एका माथेफिरुमुळे शेतकऱ्याला बराच मोठा आर्थिक फटका बसला आहे.
महिंदळे परिसरात एका माथेफिरुमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. माथेफिरूने शेतकरी अनिल भास्कर भदाणे याच्या गट नं. ३१मधील दोन एकर शेतातील अंदाजे एक एकर कपाशीचे कोवळे पीक पूर्ण शेतात जागोजागी उपटून फेकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा कपाशी लागवड करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याची मेहनतही वाया गेली आणि आर्थिक फटकाही बसला त्यामुळे पूर्ण कुटुंबाला रडू कोसळले.
शेतकरी अनिल भदाणे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला ठिबक सिंचनाच्या साह्याने दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. पावसानेही साथ दिल्याने कपाशीही जोमात होती. मध्यंतरी सलग दोन तीन दिवस पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी शेतात जाऊ शकला नाही. मात्र पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकरी अनिल भदाणे हे शेतात गेले असता त्यांना हा सगळा प्रकार दिसला.
मोठी बातमी: ठरलं तर! औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर
अनिल भदाणे यांनी पाण्याचा किफायतशीरपद्धतीने वापर करून जगवलेली पिकाशी आता मातीमोल झाली आहेत. शिवाय त्यांनी पाण्यावर मोठा खर्चही केला होता. या पिकाला नुकतेच त्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली होती मात्र अज्ञात माथेफिरूने अंदाजे एक एकर क्षेत्रातील कोवळी कपाशीची झाडे उपटून फेकली आहेत. सध्या या घटनेमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Farmer the Journalist: शेतकऱ्यांसाठी कृषी जागरण कडून 'फार्मर द जर्नालिस्ट' कार्यशाळेचे आयोजन
बापरे! चक्क गटारीच्या पाण्याने धुतली भाजी; किळसवाणा प्रकार उघडीस
Share your comments