1. बातम्या

बापरे! चक्क गटारीच्या पाण्याने धुतली भाजी; किळसवाणा प्रकार उघडीस

राज्यात पावसाला चांगलीच सुरुवात झाली असून रस्त्यांच्या बाजूकडील गटारे, नाले भरून वाहत आहेत. अशातच आता सोशल मीडियावरून एक व्हिडीओ वायरल होत आहे. ज्यात एक भाजी विक्रेता चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धूत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे

राज्यात पावसाला चांगलीच सुरुवात झाली असून रस्त्यांच्या बाजूकडील गटारे, नाले भरून वाहत आहेत. अशातच आता सोशल मीडियावरून एक व्हिडीओ वायरल होत आहे. ज्यात एक भाजी विक्रेता चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धूत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोग्याच्याबाबतीत अशी छेडछाड केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना घडली आहे वर्धा जिल्ह्यात. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे शुभम टामटे नामक भाजी विक्रेत्याने हे कृत्य केले आहे. गुरुवारी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांकडून विक्रेत्याबाबत संताप व्यक्त होत होता. अखेर शुक्रवारी विक्रेत्याविरुद्ध गंभीर दखल घेत हिंगणघाट नगरपालिकेचे प्रशासनक सतीश मासाळ यांनी पोलिसात तक्रार दखल केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला आहे.

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे

हा भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या डांगरी वार्डातील रहिवासी आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे हे दिसत आहे की, सदर भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या मनसे चौकात असलेल्या नालीतून आपली भाजी धूत आहे. तेथील एका रहिवास्याने याचे चित्रण करून सोशल मीडिया वर व्हायरल केले. या वाईट कृत्यामुळे शुभम टामटे याच्यावर भादवीच्या कलम 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alovera Farming: 'या' शेतीमध्ये माफक गुंतवणुकीतून दरवर्षी पाच पट नफा देण्याची आहे क्षमता, लवकर देऊ शकते आर्थिक समृद्धी

नागरिकांकडून विक्रेत्याबाबत संताप व्यक्त

नागरिकांकडून विक्रेत्याबाबत संताप व्यक्त

पावसाळ्यात अनेक आजार डोके वर काढत आहेत. अशातच या भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र या भाजी विक्रेत्यामुळे नागरिक हातगाडीवर भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांकडे संशयाने बघत आहेत. प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: ठरलं तर! औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर
शेतकऱ्यांना कोट्यावधील गंडा घालणारा अटकेत! उकीरड्यात पुरुन ठेवलेले लाखो रुपये..

English Summary: Vegetables washed with sewage water Published on: 16 July 2022, 03:49 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters