सध्या लग्न म्हटलं की अमाप खर्च हे निश्चितच असते. लग्न विधीमध्ये अनेक परंपरा असतात. त्यातीलच एक वरात. लग्नाची वरात तर संपूर्ण लग्नविधींमधला आकर्षणाचा भाग असतो. स्वागत समारंभ कधी घोड्यावरून, तर कधी बग्गी तसेच कारमधून काढण्यात येते. नवीन परंपरेनुसार त्याला डीजे ची जोडदेखील असते. डी.जे च्या तालावर नाचून ही वरात काढली जाते. या वरातीवर देखील अमाप खर्च होत असतो.
मात्र भंडारा जिल्ह्यातील दहेगावमध्ये एका शेतकरी पुत्राची एक आगळी वेगळी वरात पाहायला मिळाली. या शेतकरी पुत्राने असे काही काम केलं आहे की ज्यामुळे त्याच सगळीकडून कौतुक होत आहे. त्याने आपल्या लग्नाची वरात चक्क बैलगाडीतून काढली. यावेळी बैलगाडीला अतिशय सुरेख पद्धतीने सजवण्यात आले होते. बैलगाडीची आकर्षक सजावट लोकांच्या आकर्षणाचा भाग बनला होता.
या बैलगाडीतून वरात काढत असताना डीजे ची सुद्धा सोबत होती. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर चांगलेच थिरकले. या आकर्षित आणि आगळ्या वेगळ्या वरातीची चर्चा सगळीकडे होत आहे मात्र विशेष करून या तालुक्यात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवाय शेतकरी पुत्राने बैलगाडीतून वरात काढल्यामुळे ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
साखर आयुक्तांचा मायक्रो प्लान! अतिरिक्त ऊस गाळपासाठी साखर आयुक्तांनी बनवला हा मायक्रो प्लान
आता रंगेबिरंगी भाताची जगभरात चर्चा; अनेक आजारांवर आहे उपयुक्त
तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
Share your comments