सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न असेल, कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल दराचा प्रश्न असेल अशा या ना त्या कारणाने शेतकरी खचून जात आहे. यातून त्यांच्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होतात. तसेच सरकारकडून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. शेतात अमाप कष्ट घेऊनही शेतकऱ्याला हवे तसे उत्पन्न न मिळाल्यामुळे खचून जाऊन स्वतःचेच जीवन ते संपवत आहेत. अशीच एक दुःखद घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्याच विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. उन्हाळी धानाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या वाट्याला आले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. या आर्थिक विवंचनेतूनच शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. कमी उत्पादनामुळे कर्जदारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकऱ्याला सतावत होता. अखेर या सगळ्याला कंटाळून शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील विहिरीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
ही दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील टेंभरी परिसरात घडली आहे. देवराम तुळशीराम शिंगाडे या शेतकऱ्याने वयाच्या 58 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. देवराम शिंगाडे हे गेली कित्येक वर्षांपासून शेतीसह पशू व्यवसाय देखील करीत होते. यंदा त्यांनी तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी केली होती. त्यावर त्यांनी जवळपास साठ हजार रुपयांच्या वर खर्च केले. यासाठी पंचावन्न हजार रुपयांचे कर्जही घेतले होते. मात्र अमाप कष्ट घेऊनही तीन एकरात केवळ पंधरा पोती धान उत्पादन झाले.
आता शेतकऱ्यांना कर्ज घेणं झालं सोपं; कमी कागदपत्रात मिळवा लाखोंचे कर्ज, KCC आजच घ्या लाभ
एवढे कष्ट घेऊन मनासारखे उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरी देवराम शिंगाडे नाराज होते. शिवाय आर्थिक अडचणी वाढतच चालल्या होत्या अखेर त्यांनी गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. शेतकरी देवराम शिंगाडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Mansoon News : हवामान विभागाचा सुधारित मान्सून अंदाज आला…! 'या' राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस
शेतात भाजीपाला,फळे पिकवा आणि विका या ऑनलाईन साइटच्या माध्यमातून, घरबसल्या मिळेल चांगला नफा
Share your comments