1. कृषीपीडिया

शेतात भाजीपाला,फळे पिकवा आणि विका या ऑनलाईन साइटच्या माध्यमातून, घरबसल्या मिळेल चांगला नफा

लॉकडाऊन च्या काळामध्ये शेतकऱ्यांसमोर शेतमाल खास करून भाजीपाला आणि फळे विकण्यात खूप समस्या निर्माण झाले होत्या.वाहतुकीच्या सुविधांअभावी शेतकऱ्यांना आपला माल विकता येत नव्हता त्यामुळे त्यांना खूप तोटा सहन करावा लागला.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this online site is so helpful for online selling to fruit and vegetable

this online site is so helpful for online selling to fruit and vegetable

लॉकडाऊन च्या काळामध्ये शेतकऱ्यांसमोर शेतमाल खास करून भाजीपाला आणि फळे विकण्यात खूप समस्या निर्माण झाले होत्या.वाहतुकीच्या सुविधांअभावी शेतकऱ्यांना आपला माल विकता येत नव्हता त्यामुळे त्यांना खूप तोटा सहन करावा लागला.

वाहतूक ठप्प असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल विकता येत नसल्याने शेतमालाचे देखील खूप नुकसान झाले होते.

त्या परिस्थितीत अनेक खाजगी कंपन्यांनी या दिशेने हात पुढे करत शेतकऱ्यांना मदत करण्याचा विचार केला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची फळे आणि भाजीपाला ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अशा कंपन्यांनी केले.

आजच्या काळात या ऑनलाईन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू लागला आहे. या लेखात आपण अशाच काही ऑनलाईन साइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:मोदी सरकारचा हरभरा उत्पादकांना मोठा धक्का; पुन्हा एकदा खरेदीवर बंदी,शेतकरी आर्थिक अडचणीत

 ऑनलाईन व्यवसाय कल्पना

1- बिग बास्केट ऑनलाइन साईट- या ऑनलाइन साइट बद्दल तुम्ही आधी ऐकले असेल.ही ऑनलाइन सेट तुम्हाला अशी सुविधा देते की,

तुम्ही तुमच्या घरच्याघरी आरामात हिरव्या भाज्या,फळे, दूध इत्यादी ऑर्डर करू शकता आणि त्यांचे डिलिव्हरी बॉईज तुमच्या घरी सामान सहज पोचवतात.

त्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे बिग बास्केट साईट वाले या गोष्टी कुठून आणतात. तर हा सर्व माल शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचतो.

अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा मला ऑनलाईन विकायचा असेल तर तुम्हाला बिग बास्केटसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.यानंतर तुमचा कच्चा मालच विकला जाईल आणि तुम्हाला घरबसल्या नफा देखील मिळेल.

2- इस्टा मार्ट-तुम्ही सर्वांनी स्विगी चे नाव ऐकले असेल. ही ऑनलाईन सेवा घरबसल्या लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम करते. परंतु दैनंदिन गरजांची ऑनलाईन मागणी पाहता स्विगी ने इन्स्टा मार्ट सुरु करून लोकांसाठी सेवा सुरू केली आहे.

नक्की वाचा:कोथिंबीर लागवडीचे हे तंत्रज्ञान स्वीकारा आणि बक्कळ नफा कमवा

ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार रोज घरबसल्या ताज्या हिरव्या भाज्या, फळे इत्यादी ऑर्डर करू शकतात.

शेतकरी स्वतः या ऑनलाईन व्यवसायात सहभागी होऊन चांगला नफा मिळू शकतात. घरी बसून ऑनलाईन व्यवसाय करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. शेतकऱ्यांना फक्त या साइटवर नोंदणी करावी लागते.

3- ब्लींकीट/ ग्रोफर्स-सध्या प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे. अशा परिस्थितीत ब्लींकेटचा असा दावा आहे की ते सर्वात जलद सेवा देणारे ॲप आहे.ब्लिकीट दहा मिनिटाच्या आत ग्राहकांना वस्तू वितरीत करते.

त्याची लोकप्रियता खूप वाढत आहे. त्यामुळे या साईटवरून फळे आणि भाज्या मागायला लोकांनी पसंती दिली आहे.

शेतकरी बांधवांना चांगला नफा मिळवायचा असेल तर ते आपली फळे आणि भाजीपाला येथे विकू शकतात. या साइटच्या माध्यमातून चांगला नफाही मिळेल आणि भाजीपाला विकण्याची गरज देखील भासणार नाही.

4- झेप्टो-शेतकरी बांधव या ॲप्सवर स्वतःचे नोंदणी करू शकतात. ताज्या हिरव्या भाज्या, फळे यासारखा शेतमाल या माध्यमातून विकू शकतात. आधुनिक पद्धतीचा वापर करून शेतकरी स्वतःसाठी उत्पन्नाचे साधन बनवून आर्थिक अडचणीवर मात करू शकतात.

नक्की वाचा:Health Tips:वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आहारात 'या' फळांचा करा समावेश, होईल फायदा

 या ऑनलाईन व्यवसायांचा फायदा कसा घ्यावा?

1- सर्वप्रथम तुम्हाला तुमची फळे आणि भाजीपाला कोणत्या ऑनलाईन साइटवर विकायचा आहे हे निवडावे लागेल.

2- तुम्ही तुम्ही पिकवलेली फळे आणि भाजीपाला एकापेक्षा जास्त ऑनलाईन साइटवर विकू शकतात.

3- तुम्हाला हे ऑनलाईन ऍप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल.

4- त्यानंतर तुम्ही त्या साईटवर विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागेल.

5- त्यानंतर तुम्हाला कोणती वस्तू विकायची असेल ती अपलोड करावी.

6- शेवटच्या टप्प्यात, जेव्हा तुमचा माल ग्राहक खरेदी करेल तेव्हा डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी येईल आणि त्या ऑनलाईन कंपनीद्वारे वस्तू घेऊन जाईल.

English Summary: this online site is so helpful for online selling to fruit and vegetable Published on: 26 June 2022, 09:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters