आपल्या परिसरात आपण कितीतरी मोकाट जनावरे बघतो. मोकाट प्राण्यांची देखभाल करणारे कोणी नसल्याने त्यांच्यावर अनेक संकटे ओढवतात. खूप कमी लोक माणुसकी दाखवत मोकाट प्राण्यांना मदत करतात. बऱ्याचदा नागरिक कचरा असाच उघड्यावर फेकून देतात. त्यात असलेले प्लॅस्टिक आजपर्यंत कितीतरी प्राण्यांच्या जीवावर बेतले आहे. मात्र मालेगाव शहारात भलताच प्रकार घडला आहे. त्यामुळे मालेगावकरांची देखील तारांबळ उडाली होती.
मालेगाव शहरातील वर्धामान नगरमध्ये वावरणाऱ्या मोकाट बैलासोबत हा प्रकार घडला आहे. या बैलाचे तोंड एका पत्र्याच्या डब्यात अडकले. काय करावे हे न सुचल्याने बैल वर्धामान नगरमध्ये मधेच उधळला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे मात्र तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बैल सैरभैर होऊन इकडून तिकडे पळू लागला.
उधळलेल्या बैलाचा नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. जीव मुठीत धरून नागरिक पळ काढत होते. शेवटी तेथील स्थानिकांनी तातडीने याबाबत पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिळून बैलाच्या तोंडात अडकलेला पत्र्याचा डबा काढला. मोकाट वावरणाऱ्या बैलासोबत वर्धमान नगरमधील नागरिकांनीदेखील सुटकेचा श्वास सोडला.
डर के आगे जीत है! कांद्याने रडवले तर पातीने हसवले; वाचा भन्नाट शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा
असा ओढवला प्रसंग
मालेगाव शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांची संख्या काही कमी नाही. वर्धमान नगरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक बैल चरत होता. आणि कचऱ्यात असलेल्या एका पत्र्याच्या डब्यातच बैलाचे तोंड अडकले. बैलाचा जबडा डब्यात फसल्याने बैल गांगरून गेला आणि पळू लागला. त्याने बरेच प्रयत्न केले मात्र तरीही त्याचा जबडा पत्राच्या डब्यातून काही केल्या निघेना. शेवटी पळून पळून बैल झाडाखाली जाऊन बसला. त्याला मदत करायला नागरिक पुढे सरसावले की तो पुन्हा धावायला लागयचा.
गोरक्ष व प्राणी प्रेमींचा मदतीचा हात
बैलाचे तोंड पत्र्याच्या डब्यात अडकल्याने त्याला मदत करण्यासाठी अनेक प्राणीप्रेमी आणि शहरातील गोरक्ष पुढे सरसावले. सर्वांनी मिळून
कासऱ्याच्या मदतीने बैलाला झाडाखाली बांधले. खूप वेळ पत्र्याचा डबा तोंडात राहिल्याने त्याच्या तोंडाला जखम झाली होती. त्यांनी लगेचच पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.
अखेर बैलाची सुटका
तोंडातच डबा अडकल्याने बैलाला चारा खाणे तर सोडाच पण त्या भागात गंभीर जखम झाली होती. पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक यांनी जोखीम पत्करून त्याच्या तोंडातील डबा काढून त्याच्यावर उपचार करून, मुक्त केले. गोरक्ष, प्राणीप्रेमी आणि पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बैलाचा जीव वाचला आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांची मेहनत 'पाण्यात'; पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान,शेतकरी संकटात
धक्कादायक: विजेची तार अंगावर पडून 11 जनावरे जीवाला मुकली
Share your comments