1. बातम्या

ऐकावे ते नवलंच! मॅकडोनाल्डमध्ये जेवणासाठी 'ही' कंपनी देणार तब्बल 1 लाख रुपये पगार; वाचा काय आहे 'हा' माजरा

नवी दिल्ली : जर तुम्हाला कोणी अशा कामाबद्दल सांगितले ज्यामध्ये तुम्हाला रोज मोफत जेवण मिळते आणि हे जेवण संपवण्याच्या बदल्यात तुम्हाला पगार म्हणून 1 लाख रुपये मिळतील तर तुमचा विश्वास बसेल का?

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Ajab Gajab News

Ajab Gajab News

नवी दिल्ली : जर तुम्हाला कोणी अशा कामाबद्दल सांगितले ज्यामध्ये तुम्हाला रोज मोफत जेवण मिळते आणि हे जेवण संपवण्याच्या बदल्यात तुम्हाला पगार म्हणून 1 लाख रुपये मिळतील तर तुमचा विश्वास बसेल का?

आज आम्ही तुम्हाला अशाच एका जॉबबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये 6 जागा रिक्त आहेत. यासाठी तुम्हाला फक्त मॅकडोनाल्ड आणि ग्रीसला जाऊन खावं लागेल.

आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मटेरियल मार्केट डॉट कॉम नावाची ही कंपनी अशा लोकांना शोधत आहे जे फास्ट फूड आउटलेट मॅकडोनाल्डमध्ये जाऊन जेवण करतील. या रिक्त पदांना टेकअवे टेस्टर असे नाव देण्यात आले आहे.

वास्तविक, या कंपनीला ब्रिटनमध्ये सर्वोत्तम फास्ट फूड कुठे मिळते हे शोधायचे आहे. या रिक्त पदांतर्गत, तुम्हाला सामील झाल्यानंतर, तुम्हाला दररोज वेगवेगळ्या आऊटलेट्सवर खावे लागेल.

त्या बदल्यात कंपनी तुम्हाला 1000 पौंड पगार देईल, म्हणजेच भारतीय रुपयानुसार तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. वाचून आश्चर्यचा धक्का बसला ना!

या लोकांना दर महिन्याला देशभरातील 20 आउटलेटवर जेवण करावे लागेल. यासोबतच त्यांना जाऊन गुंतवणूकदारांना तुमचे जेवण कसे आवडले हे सांगावे लागेल.

याशिवाय तुमचे पोट भरले आहे की नाही हे कंपनीला सांगावे लागेल. यानंतर तुम्हाला सांगावे लागेल की अन्न खाल्ल्यानंतर तुमची एनर्जी लेव्हल कशी आहे.

कंपनी यासाठी व्यावसायिक पोषणतज्ञांची नियुक्ती करत आहे. यूकेमध्ये सर्वोत्तम खाद्यपदार्थ काय असू शकतात हे शोधण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 

English Summary: Listen to it! This company will pay Rs 1 lakh for a meal at McDonald's; Read what 'ha' is Published on: 11 May 2022, 06:39 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters