अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प शेती यंत्रे व अवजारे, कृषि व कृषि उदयोगावरील आधारीत ऊर्जा व कापणी पश्चात तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथील कृषि अभियांत्रिकी महाविदयालय येथे दि 16 मार्च 2022 रोजी तंत्रज्ञान आणि यंत्र प्रात्याक्षीक मेळावा आयोजीत करण्यात आला होता या मेळाव्यात विदर्भाच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी व महीला वर्गाने भाग घेतला मेळव्याच्या सुरुवातीला उद्घाटन समारंभ घेण्यात आला व त्यानंतर विविध यंत्रे व अवजाराची माहीती व प्रात्यक्षिके देण्यात आली.
सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन डॉ. पंजाबराव देशमुखांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ. आर. एम. गाडे. संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पं.दे.कृ. वि. अकोला हे होते. सुरुवातीला प्रास्ताविकात डॉ. बकाने, संशोधन अभियंता यांनी आयोजीत एक दिवसीय मेळयाव्याचे महत्व आणि रुपरेषा समजावून सांगीतली
डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी यांनी शेतीच्या यांत्रिकी करणाचे महत्व समजावून सांगीतले व यांत्रीकीकरण ही काळाची गरच असुन आता त्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतीपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. ययाती तायडे, अधिष्ठाता कृषि यांनी विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध तंत्रज्ञान व वाणांची माहीती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. गाडे, संचालक विस्तार शिक्षण यांनी मार्गदर्शन केले, शेतीला जोडधंदयाचे जोड देण्याची गरज असुन विविध प्रशिक्षणाची माहिती दिली. विशेषतः महिला बचत गटासाठी शासनाच्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली.
उद्घाटन समारंभानंतर कृषि अधिकारी सौ. ज्योती चोरे यांनी शेतक-यांना महाराष्ट्र शासनादारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे महत्त्व आणि त्याचा लाभ कसा घ्यावा. त्यासाठी लागणारी कागदपत्रे या सगळ्यांची विस्तृत माहिती दिली. कृषि विद्यापिठ व कृषि विभाग सदैव शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित आहे. याची खात्री करून दिली.
त्यानंतर अनुक्रमे अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प कृषि यंत्रे व अवजारे, कृषि व कृषि उदयोगावरील आधारीत उर्जा व कापणी पश्चात तंत्रज्ञान याच्याद्वारे विविध उपकरणे यंत्रे याची माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. कृषि यंत्रे व अवजारे विभागात डॉ. मृदुलता देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी विविध यंत्रांचे माहिती दिली सोबतच स्प्रेअर, रोटरी विडर यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विभागाचे तज्ञ डॉ. एस. एच. ठाकरे विभाग प्रमुख कृषि शक्ती व अवजारे विभाग यांनी सुदधा शेतक-यांना रुंद सरी वरबा पेरणी यंत्र तसेच इतर अवजारांची माहिती दिली तसेच डॉ. एस. के. ठाकरे, डॉ. ए. व्ही. गजाकोस, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. डी. एस. कराळे यांनी सुदधा शेतक-यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. पी. पी. नलावडे यांनी त्यांच्या विभागातील सौर उपकरणांची माहीती व प्रात्यक्षिक दिले.
डॉ. एस. आर. काळबांडे,मूख, अपांरपारीक उर्जास्त्र डॉ. व्ही. बी. शिंदे, अपांरपारीक उर्जास्त्र यांनी सुदधा ना मार्गदर्शन केले. कापणी पश्चात अभियांत्रीकी व तंत्रज्ञान योजनेद्वारे तयार उपकरणांची माहिती डॉ. बकाने, संशोधन अभियंता यांनी दिली.
काव्यामध्ये डॉ. जी. यु. सातपुते विभाग प्रमुख मृद व जल संधारण अभियांत्रीकी गुप्ता, विभाग प्रमुख कृषि प्रकीया व कृषि स्थापत्य विभाग डॉ. भाग्यश्रीधा सहभाग होता.
मेळावा सफल होण्यासाठी अखिल भारतीय संशोधन प्रकल्प कृषि यंत्रे व अवजारे येथील श्री. एस. बी. खांबलकर, श्री. डि.एस. कांबळे, श्री. आश्विन फुकट, श्री. भुषण चवरे यांनी परीश्रम घेतले.
उद्घाटन सोहळयाचे संचलन डॉ. मृदुलता देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ व आभार प्रदर्शन डॉ. परीश नलावडे, संशोधन अभियंता यांनी केले.
तसेच या वेळी आचार्य पदवीधर विद्यार्थी वासू साहू, शिवा कानडे, मयूर, रीजु लुकोसे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी निखिल यादव, स्वप्निल, गोपाल इतर विद्यार्थी उपस्थित होते.
Share your comments