महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी एक आवाहन केले आहे. वीज ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाइन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा ‘गो ग्रीन’चा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाइन पेमेंट आणि ‘गो ग्रीन’ या तिन्हीचा वापर केला तरीही सूट मिळते.
दरमहा किमान २० रुपयांची वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते.
टोमॅटोचे भाव पडले त्यावेळी कुठं गेले होते आता ओरडणारे...?
हे बिल ‘भीम अँप’, ‘गुगल पे’, ‘पेटीएम’ किंवा बँकेच्या अँपवरून किंवा ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते.
महिना ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाला दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते, यामुळे हे फायदेशीर आहे. यामुळे महावितरणकडून हे आवाहन करण्यात आले आहे.
कोंबडा मिळेल का कोंबडा! एक किलो कोंबड्याचा भाव 800 ते 900 रुपये...
कौतुकास्पद! महिला बचत गटाने उभारला सामूहिक गोठा..
कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा कामांचा धडाका! शेतकऱ्यांसाठी घेतले अनेक निर्णय..
Share your comments