1. बातम्या

कृषी पंप थकबाकी:कृषी पंपाच्या क्षमतेनुसार वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना टार्गेट

सध्या कृषी पंपाच्या वीज कनेक्शन तोडणीचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे. कृषी पंप विज थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी यासाठी महावितरणने कनेक्शन तोडणीमोहीम हाती घेतली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
electricity bill pending of agriculture pump

electricity bill pending of agriculture pump

सध्या कृषी पंपाच्या वीज कनेक्शन तोडणीचे  प्रकरण राज्यभरात गाजत आहे. कृषी पंप विज थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी यासाठी महावितरणने कनेक्शन तोडणीमोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्र मध्ये कृषी पंपाचे ग्राहकहे44 लाखांपेक्षा जास्त आहेत.परंतु यामध्ये निम्म्या ग्राहकांकडे मिटर नसल्याचे समोर आले आहे. सन 2015 च्या अगोदर कनेक्शन घेतलेलं कडे मीटर नसल्याने त्यांचा सब स्टेशन वरील जो काही विजेचा निर्देशांक आहे तो निश्चित करून शेतकऱ्यांना सरसकट समान वीजबिल दिली जातात व त्यामुळे सरसकट वीजबिल भरावे लागत असल्याने थकबाकीत वाढ झाल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.

 महाराष्ट्रातील एकूणच विजेची आणि कृषीपंप थकबाकीची स्थिती

 महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर प्रति युनिट 40 ते 60 पैसे अधिकचा दर इतर राज्यांच्या तुलनेत आकारला जातो. हा विजेचा दर विद्युत नियामक आयोग निश्चित करते.त्यानंतर राज्य शासनाकडून च्या काही सवलती मिळतात त्या सवलती ग्राह्य  धरून शेतकऱ्यांचा विजेचादर हा निश्चित केला जातो. तसेच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र मध्ये पारेषण चा खर्च देखील अधिक आहे कारण राज्यात कोळशाच्या खाणी कमी असून वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा हा परराज्यातून तसेच बाहेरील देशातून देखील मागावा लागतो.

त्यासोबतच महाराष्ट्रातील बहुतांशी वीज निर्मिती केंद्रे हे मराठवाड्यात व विदर्भात जास्त आहेत आणि त्यादृष्टीने मागणीचा विचार केला तर ती पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे. त्यामुळे पारेषण चा  खर्च वाढतो त्यामुळेच विजेचे अधिक दर असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले. यामधील दुसरे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये कृषी पंपांना चे काही वीजेचे दर आकारले जातात ते सुद्धा शेती पंप हा किती एचपी चा आहे त्यावर अवलंबून आहे. म्हणजेच या शेती पंपांना मीटर नाही अशा कृषी पंपांना दर आकारताना जर कृषी पंप 3 एचपी चा असेल तर दरमहा 228 रुपये, पाच एचपी चा असेल तर 244 रुपये, साडेसात एचपी चा असेल तर 260 रुपये आणि दहा एचपी साठी दरमहा तीनशे सहा रुपयांचे दर सरसकट भरावे लागते.

यामध्ये होते असे की एवढी वीज वापरली नसतानाही बिल का भरायचे हा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात आहे. जर राज्याच्या कृषी पंप थकबाकीचा विचार केला तर ती चाळीस हजार कोटींपर्यंत आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांनी भरावी यासाठी  शासनाने कृषी पंप धोरण जाहीर केले.या धोरणांतर्गत 2020 पूर्वीच्या थकबाकीच्या पस्तीस टक्के रक्कम जर भरली तर संपूर्ण थकबाकी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला.परंतु चुकीचे बिलांमुळे शेतकरी थकबाकी भरायला तयार नाहीत.

 वीज कनेक्शन तोडणी टाळण्यासाठी विद्युत पंप क्षमतेनुसार टार्गेट

वीज कनेक्शन तोडणी  जर थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या क्षमतेनुसार एक टार्गेट देण्यात आले आहे त्यानुसार…..

  • 3 एचपी चा कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांनी दहा हजार 260 रुपये भरायचे आहेत.
  • पाच एचपी क्षमतेचा कृषिपंप असलेल्यांसाठी अठरा हजार तीनशे रुपये
  • साडेसात एचपी चा कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांसाठी 29 हजार दोनशे पन्नास रुपये आणि
  • दहा एचपी चा कृषी पंप असलेल्यांसाठी 25 हजार 900 रुपये भरायचे आहेत. असे देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(स्त्रोत-सकाळ)
English Summary: farmer give target for pay electricity pending bill by mahavitaran Published on: 15 March 2022, 10:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters