
symbolic image
प्राणी आणि मानवाचे नाते बऱ्याच अंशी अतूट आणि खूप सौहार्दपूर्ण असते, असे बऱ्याच प्रसंगानुरूप दिसून येते. अलीकडेच एका वर्तमानपत्रात बातमी वाचनात आली होती की, घर मालकाला त्यांच्या घरी असलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याच्या तावडीतून वाचवले.
अशा बऱ्याच घटना ऐकायला किंवा वाचायला येतात. अशीच एक मन भरून येणारी, मानव आणि प्राणी यांच्यातला प्रेमळ संबंधाची बातमी समोर आली आहे. या बातम्यांचा सविस्तर आढावा या लेखात पाहू.
बिबट्याचा बछडा आठवडाभर घरचा पाहुणा
एके दिवशी सकाळी सकाळी शेतातील घरासमोरील अंगणात नारळाच्या झाडा जवळ एक मांजरी सारखा प्राणी मुलांना दिसला अन घरातील लहानगे त्या मांजरी सारख्या पिला सोबत खेळू लागली. जेव्हा हे दृश्य घरच्या आजोबांनी पाहिले तेव्हा त्यांना कळले की हे मांजरीचे पिल्लू नसून ये बिबट्याचे बछडे आहे. अगोदर ते खूप सावध राहिले. कारण त्यांना वाटत होते की त्याची आई कधीही येईल त्याला घेऊन जाईल. परंतु एक दिवस उलटला दोन दिवस उलटले तरी बछड्याची आईचा काही तपास लागे ना केव्हा ती काही परत आली नाही. परंतु या मधल्या काळात हा बछडा घरात इकडे तिकडे पाहुण्यासारखा हिंदळू लागला घरातील लहान मुलां सोबत खेळू लागला.
घरातल्या दीड वर्ष वयाच्या तन्वीच्या अंगाखांद्यावर तो खेळत होता. पूर्ण दिवसात त्याला दीड लिटर दूध प्यायला दिले जात होते. या सगळ्यात प्रेमाने हा बछडा एवढा माणसाळला की त्याला सर्वांचा लळा लागला होता. त्यामुळे घरातील प्रत्येकाला वाटत होते की आता याला आपल्या सोबतच घरातच ठेवावे. परंतु ते शक्य नव्हते कारण कायद्याने त्या प्रकारची परवानगी नव्हती. बछड्याची आई रात्री येईल व त्याला घेऊन जाईल म्हणून त्याला बाहेर ठेवले जायचे. परंतु संपूर्ण आठवडा उलटून देखील त्याची आई काही आली नाही. मोठ्या जड अंतकरणाने वनखात्याला या संबंधित माहिती देण्यात आली व त्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर औषध उपचार करण्यात येत आहेत. दोन दिवस त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्यात येणार असून नंतर त्याला मूळ आदिवासात सोडण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथील घटना
मालेगाव तालुक्यात खाकुर्डी येथील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या मोरदर शिवारातील शेतातील घरासमोर पाच दिवसांपूर्वी ठाकरे यांचा नातू तीर्थ याला नारळाच्या झाडा जवळ अडीच महिन्याचा बछडा दिसला. या परिसरात सगळीकडे ऊस, तसेच बागायती पट्टा असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा संचार कायम असतो. हा बिबट्याचा बछडा अंगणात असल्याने घरातील लहान मुले त्याच्या जवळ जाऊन खेळू लागली. ठाकरे यांची दीड वर्षाची नात तन्वी त्या बिबट्याच्या बाळाला उचलून त्याला अंगा-खांद्यावर मिरवत फिरवत असे. तन्वीच्या तो अंगावरचा झाला होता. परंतु बिबट्याचा बछडा घरातील मुलांसोबत राहणे हे ठाकरे कुटुंबांना जोखमीचे आणि भीतीदायक वाटल्याने त्यांनी सोमवारी वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा हिरे यांनी वनविभागाचे पथक व वाहन पाठवून बछडा ताब्यात घेतला. या वेळी घरातील मुले खूप गहिवरली. तनवी ला तर रडायलाच आले.
आता याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली व तो चालणार करण्यासाठी सक्षम असला तरी सदृढ नसल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले असून काही दिवस तो वन विभागाच्या नर्सरीत निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. नंतर त्याला मूळ अधिवासात पाठवण्यात येणार आहे.(स्रोत-दिव्यमराठी)
Share your comments