1. कृषीपीडिया

Medicinal Plant : 15 हजार रुपये गुंतवणूक करून सुरु करा या औषधी वनस्पतीची शेती आणि कमवा 3 महिन्यात 3 लाख

नवी मुंबई: मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अशा पिकाची माहिती सांगणार आहोत ज्याची शेती तुम्ही खुपच कमी खर्चात करू शकता. मित्रांनो तुम्ही या पिकाची शेती 15000 रुपय गुंतवणूक करून करू शकता. जर तुम्हाला कमी पैशात शेतीतुन बक्कळ पैसा कमवायचा असेल तर या पिकाची शेती तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. तुम्ही शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल करून या पिकाची शेती सुरू करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे

नवी मुंबई: मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अशा पिकाची माहिती सांगणार आहोत ज्याची शेती तुम्ही खुपच कमी खर्चात करू शकता. मित्रांनो तुम्ही या पिकाची शेती 15000 रुपय गुंतवणूक करून करू शकता. जर तुम्हाला कमी पैशात शेतीतुन बक्कळ पैसा कमवायचा असेल तर या पिकाची शेती तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. तुम्ही शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल करून या पिकाची शेती सुरू करू शकता.

मित्रांनो आम्ही ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते पीक तुळशीचे. तुळशीची शेती कमी वेळेत आणि शाश्‍वत उत्पादन देणारी शेती ठरू शकते. खरं पाहता, तुळशीचे रोप प्रत्येकाच्या घरात असते आणि प्रत्येकाला हे माहित असेलच की तुळशीचे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

इतकेच नाही तर हिंदू धर्मात लोक त्याची पूजा करतात. मात्र जर आपणास शेती व्यवसायातून अधिक नफा कमवायचा असेल तर, आपण याची व्यावसायिक स्तरावर लागवड करून चांगला भरपूर नफा कमवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो की, कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठी तसेच औषधांसाठी तुळसचा मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जाऊ लागला आहे.

उज्जैनमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याने 10 बिघा जमिनीत 10 किलो बियाणे पेरले होते. त्यासाठी त्याला एकूण 15000 खर्च आला. तुळशीचे पीक 3 महिन्यांत तयार होते. कृषी तज्ञांच्या मते, एक बिघा शेती करण्यासाठी 15000 रुपये खर्च येतो.

तुळशीच्या झाडाचे मूळ, देठ आणि पानांसह सर्व भाग औषधी बनवण्यासाठी वापरतात. तुळशीची वनस्पती आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक आणि अॅलोपॅथिक औषधांमध्ये वापरली जाते. बाजारात तुळशीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक औषधेही भरपूर बनवली जात आहेत. ज्यामध्ये तुळशीचा खूप उपयोग होतो. यामुळे तुळशीला बारामही मागणी असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना यांची शेती विशेष फायदेशीर ठरत आहे.

English Summary: Medicinal Plant: Start cultivating this medicinal plant with an investment of Rs 15,000 and earn Rs 3 lakh in 3 months Published on: 10 May 2022, 10:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters