1. बातम्या

चमोली जिल्ह्यात लागवड केली जाणारी हळद आहे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, इतर हळदीपेक्षा आहे कर्क्युमिनची मात्रा अधिक

चमोली जिल्ह्यामध्ये लागवड केली जाणारी हळद ही उच्च गुणवत्तेची असून वैज्ञानिकांच्या संशोधनात ही बाब समोर आली असून देशातील अन्य ठिकाणी आढळणाऱ्या हळदी पेक्षा चमोली जिल्ह्यात उगवली जाणाऱ्या हळदीत कर्क्युमिन ची मात्रा जास्त आहे. उ

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cultivate in chamoli uttrakhand turmuric is superioer qulaity than other area turmuric

cultivate in chamoli uttrakhand turmuric is superioer qulaity than other area turmuric

चमोली जिल्ह्यामध्ये लागवड केली जाणारी हळद ही उच्च गुणवत्तेची असून वैज्ञानिकांच्या संशोधनात ही बाब समोर आली असून देशातील अन्य ठिकाणी आढळणाऱ्या हळदी पेक्षा चमोली जिल्ह्यात उगवली जाणाऱ्या हळदीत कर्क्युमिन ची मात्रा जास्त आहे. उ

उत्तराखंड राज्यातील संशोधकांनी हळदीवर केलेल्या संशोधनात दिसून आले की, चमोली जिल्ह्याच्या 1500 ते 1700 मीटर उंचीवर  आढळणारी हळद मध्ये इतर ठिकाणी लागवड केलेल्या हळदीच्या तुलनेत कर्क्युमिन मात्रा जास्त आहे. या शोधात सहभागी असलेले पीजी कॉलेज गोपेश्वर वनस्पती विज्ञानाचे प्रवक्ता डॉ. विनय नौटियाल यांनी सांगितले की उत्तराखंड राज्यातून 117 नमुने घेतले गेले होते, केरळ मधून पाच आणि मेघालय राज्यातून एक नमुना घेतला होता. जर मेघालय राज्य सरकारचा विचार केला तर हे सरकार 2018 पासून  हळदीवर मोठ्या स्वरूपातला एक प्रकल्प चालवित आहे. तसेच केरळ येथे हळद व मसाले यावर आधारित मोठी संशोधन संस्था आहे. या दोन्ही ठिकाणच्या हळदीची व्यावसायिक स्वरूपात खूप मागणी आहे.

त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या हळदी सोबत उत्तराखंड येथील हळदीचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. या अभ्यासादरम्यान दिसून आले की चमोली जिल्ह्यात लागवड केल्या जाणाऱ्या पारंपारिक हळदीमध्ये कर्क्युमिनची मात्रा 10.64 टक्के आहे. या तुलनेत इतर ठिकाणच्या हळदीमध्ये मात्र कमी आहे. हळदीमधील कर्क्युमिन या घटकाला अँटीसेप्टीक मानले जाते. फार्मासिटिकल इंडस्ट्रीमध्ये एक जास्त कर्क्युमिन असलेल्या हळदीला जास्त मागणी असते.

 स्वयंरोजगाराचा एक चांगला पर्याय बनू शकते ही हळद

 हळदीचे उत्पादन येणाऱ्या काही दिवसात चांगला स्वयंरोजगाराचा एक पर्याय बनू शकतो. या हळदीच्या रोपट्याला कुठल्याही प्रकारच्या वन्यजीवन पासून नुकसान होऊ शकत नाही.

जर या हळदीला सरकारकडून प्रमोट केले गेले तर एक मोठे इंडस्ट्रीच्या रूपात विकसित होऊ शकते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:बातमी कामाची! मोदी सरकारच्या 'या' योजनेचा परिवारातील एकाहून अधिक सदस्याला मिळणार का लाभ; वाचा

नक्की वाचा:आमची नैसर्गिक संसाधने कशी लुटली जात आहेत

नक्की वाचा:हटके उद्योग आयडिया! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग देईल नवतरुण शेतकऱ्यांना भक्कम उद्योग आणि रोजगाराची संधी

English Summary: cultivate in chamoli uttrakhand turmuric is superioer qulaity than other area turmuric Published on: 10 May 2022, 10:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters