1. बातम्या

ताडोबाच्या वाघाडोहने घेतला अखेरचा श्वास

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी सिनाळा येथे वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात एका पशुपालकाचा मृत्यू झाला होता.

Tadoba's Waghadoh took his last breath

Tadoba's Waghadoh took his last breath

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी सिनाळा येथे वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात एका पशुपालकाचा मृत्यू झाला होता.

तेव्हापासून ताडोबाचे अधिकारी वाघाडोह वाघावर लक्ष ठेवून होते. त्याची प्रकृती चांगली नव्हती. वाघाडोह वाघ १७ वर्षांचा होता. सोमवारी सकाळी त्यांचे नैसर्गिक कारणाने निधन झाले.

दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते.  वाघ म्हातारा असल्याने त्याला वन्य प्राण्यांची शिकार करणे कठीण झाले होते.

त्यामुळे त्याला उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. हा वाघ चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. वयस्कर असल्याने त्याला शिकार करणे अशक्य होते. तसंच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडलं होतं.

एक काळ असा होता की वाघडोह या वाघाचा ताडोबा जंगलात दरारा होता. मात्र कालांतराने त्याचं वर्चस्व हळूहळू कमी झाले व इतर वाघांनी त्याला हुसकावून लावलं होतं असंही काही वन्यप्रेमींचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघांचा धुमाकूळ सुरू आहे.  हा वाघ खूप वयस्कर व अशक्त असून तो मानव व पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकते, हे लक्षात घेऊन वनविभागाने वाघावर लक्ष ठेवले होते.

महत्वाच्या बातम्या 
महत्त्वाचा शासन निर्णय! दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन
Current Mansoon Update: भारतातील 27 मे चे मान्सूनचे आगमन लांबणार का? मान्सूनचा श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबा

English Summary: Tadoba's Waghadoh took his last breath Published on: 24 May 2022, 12:08 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters