देशात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. असे असताना मात्र उसाचा खर्च मोठ्या प्रमाणवर वाढला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. असे असताना आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहेत. उसाचा रास्त आणि योग्य भाव आता ३०५ रुपये प्रतिक्विंटल होऊ शकतो. यावेळी 10 टक्क्यांऐवजी 10.25 टक्के साखर रिकव्हरी निश्चित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची एफआरपी वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 15 रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते, त्यानंतर एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटलवरून 305 रुपये प्रति क्विंटल होईल. यावेळी 10 टक्क्यांऐवजी 10.25 टक्के साखर वसुलीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाढीव एफआरपी साखर हंगाम 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल. याबाबत निर्णय झालाच तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचे कारण म्हणजे सध्या खताच्या मजुरीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी याबाबत मागणी करत आहेत. 2021 मध्ये एफआरपी केवळ 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आली. मात्र यावेळी त्यात 15 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो दुधाचे उत्पादन वाढवण्याची सोपी पद्धत सापडली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
दरम्यान, सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ अंतर्गत एफआरपी निश्चित करते. यासाठी कृषी खर्च आणि किंमत आयोग शिफारस करतो. एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 15 रुपयांनी वाढ करण्याची कॅबिनेट नोट यापूर्वीच जारी करण्यात आली होती. एफआरपी वाढल्यानंतर काही राज्यांच्या सरकारांवर उसाच्या दरात वाढ करण्याचा दबावही वाढतो. किसान शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह सांगतात की, महागाईच्या दरानुसार एफआरपी 25 रुपये प्रति क्विंटलने वाढवावी.
एकही रुपया न गुंतवता सुरु करा कुक्कुटपालन, दरवर्षी मिळेल लाखोंचा नफा, वाचा सोप्पी पद्धत..
महागाईच्या दरानुसार एफआरपी 25 रुपये प्रति क्विंटलने वाढवावी. खते, पाणी, कीटकनाशके, मजूर सर्वच महाग झाले आहेत. त्यानुसार भावात वाढ करावी. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक आकडा जाहीर केला होता. त्यानुसार 2013-14 च्या साखर हंगामात उसाची एफआरपी केवळ 210 रुपये प्रतिक्विंटल होती. पण तो ९.५ टक्के साखर वसुलीवर आधारित होता.
महत्वाच्या बातम्या;
तुम्ही नेमके आहात कोण? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल, निर्णय विरोधात जाण्याची शक्यता
आता शेतकऱ्यांना पंप संच घेण्यासाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..
पावसाळ्यात पडणार पैशांचा पाऊस, ६०% अनुदानावर मत्स्यशेती सुरू करा, २ लाखांचे कर्जही मिळणार..
Share your comments