परभणी जिल्ह्यातील पाथरी परिसरात शेतकरी संघटनेतर्फे क्रांतिदिनी ९ ऑगस्ट २०२२ रोजी ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. दोन साखर आणि इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी यासाठी ही ऊस परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे यांनी दिली आहे.
पाथरी येथील साई निवास सभागृहामध्ये ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, अॅड. अजित काळे, शिवाजीराव नांदखिले, रामेश्वर गाडे, विमलताई आकनगिरे, बाळासाहेब पटारे, पांडुरंग रायते, माणिक शिंदे, धनंजय काकडे पाटील, सादिक कुरेशी, हाजी शब्बीर यांची उपस्थिती राहणार आहे.
दोन साखर कारखाने व इथेनॉल कारखान्यांमध्ये हवाई अंतराची अट घालण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगातील भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभाराला संरक्षण मिळाले आहे. शिवाय गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यात देखील भ्रष्ट कारभाराला सुरुवात झाली आहे. उसाला प्रतिटन ३५०० रुपयेहून अधिक भाव मिळत असतानासुद्धा तेथील साखर कारखान्यात काटामारी, वजनचोरी, रिकव्हरीचोरीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय ऊसतोडणी मजुरांची मनमानीदेखील वाढली आहे.
साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची बरीच लूट केली आहे, असे मुद्दे घेऊन ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण आयोजनाच्या नियोजनासाठी साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची अघोरी पद्धतीने लुटालूट केली, असे मुद्दे घेउन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी परभणी येथे बैठक पार पडली.
सांगा शेती कशी करायची? पाच वर्षात पहिल्यांदाच बियाणे व खतांच्या किंमतीत दुप्पट वाढ; शेतकरी हतबल
यात प्रामुख्याने कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा प्रमुख बंडू सोळंके, जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे, युवा आघाडीचे भागवत जावळे पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे सय्यद जामकर, भारत फुके, नारायण अवचार, महादेव अवचार, त्रिंबक सुरवसे, तात्यासाहेब सुरवसे, माउली निर्वळ, भास्कर निर्वळ, मोहन कुलकर्णी, अशोकराव कुलकर्णी, कृष्णा भोसले, शिवाजीराव बोबडे, रमेश माने, किशोर जोशी यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या:
आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी महिलांची शेतीशाळा; उपक्रमाची होतीये राज्यभर चर्चा
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश; कोट्यवधींचा माल जप्त,चार जण अटकेत
Share your comments