सध्या देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 330 लाख टन साखर निर्मिती झाली आहे. यातील 40 लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरण्यात आली आहे. तसेच पुढील हंगामात देखील मोठ्या प्रमाणावर साखर निर्मिती होणार आहे.
या हंगामात अपेक्षित उत्पादनापेक्षा 17 लाख टन साखर उत्पादन घटले आहे. असे असताना कारखान्यांच्या साखर विक्री दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असताना पण साखर उत्पादनासाठी येणारा खर्च विचारात घेता वाढलेला दर फार काही जास्त नाही. यामुळे इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या वतीने ही दरवाढ कायम ठेवावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी असा करा क्लेम, शेतकऱ्यांना मिळेल मदत, जाणून घ्या...
तसेच देशात 60 ते 65 लाख टन साखर कोटा राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे देशाला साखर तुटवडा होऊ शकणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोटा म्हणून 60 ते 65 लाख टन पुढील तीन महिन्यांसाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रत्येक कारखान्यास 5 ते 6 लाख टन साखर निर्यातीसाठी परवानगी द्यावी, अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे. यामुळे आता पुढील काळात काय परिणाम दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दूध धंद्यात परवडत नाही बोलणारांसाठी ही बातमी! पठ्ठ्याने चार एकर जमीन घेतलीय..
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला अत्यंत चांगला दर आहे. यामुळे सरकारकडून साखर निर्यातीला परवानगी कधी मिळते, याकडे कारखानदारांचे लक्ष आहे. यामुळे कारखान्यांना काहीसा फायदा होऊ शकतो.
रोहित पवार यांना धक्का! बारामती ॲग्रोबाबत मोठी बातमी आली समोर...
गुलाब शेती ठरली फायद्याची! केवळ 10 गुंठ्यांत लाखोंची कमाई..
ऊस क्षेत्रात 70 हजार हेक्टरने वाढ, पुणे विभागात मोठी आघाडी..
Share your comments