1. यशोगाथा

दूध धंद्यात परवडत नाही बोलणारांसाठी ही बातमी! पठ्ठ्याने चार एकर जमीन घेतलीय..

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने दूध धंद्यात करून दाखवले आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची (Dairy Farming) जोड देत त्यातून लाखो रुपयांचं नफा त्यांनी आतापर्यंत मिळवला आहे. राजु कर्डिले असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
milk business

milk business

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने दूध धंद्यात करून दाखवले आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची (Dairy Farming) जोड देत त्यातून लाखो रुपयांचं नफा त्यांनी आतापर्यंत मिळवला आहे. राजु कर्डिले असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

आर्थिक परिस्थिती पाहता त्यांनी सुरवातीला एक मैह्स घेतली. मात्र आज त्यांच्याकडे 18 गायी आणि 5 म्हशी आहेत. विशेष म्हणजे महिन्याला तब्बल दोन लाख रुपये त्यांना यातून मिळत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

पैठणमध्ये वाघाडी गावातील राजु कर्डिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र शेतीत होणारे अल्प उत्पन्न आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांनी शेती सोबतच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

मनरेगा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान

त्यांच्याकडे वडिलोपार्जित 30 गुंठे शेती होती. दुग्ध व्यवसायातुन आज त्यांनी चार एकर जमीन खेरेदी केली आहे. सोबतच दोन मजली बंगाला देखील बांधला आहे. आज देखील ते 200 ते 250 लिटर दुध रोज डेअरीला पाठवतात.

ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी, जाणून घ्या..

त्यांनी यासाठी मुक्त गोठा उभारला आहे. मुक्त संचार गोठ्यामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहते. तसेच दुधाचं प्रमाण चांगले राहावे यासाठी गाईंना गवत, कडबा, मका, पेंन्ड, उसाची कुटी, हा चारा देण्यासाठी कुट्टी मशीनचा वापर करण्यात येतो. त्यांचे कुटुंब यासाठी त्यांना मदत करते.

गुलाब शेती ठरली फायद्याची! केवळ 10 गुंठ्यांत लाखोंची कमाई..
शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी असा करा क्लेम, शेतकऱ्यांना मिळेल मदत, जाणून घ्या...
जिल्हाबंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा...!! राजू शेट्टी यांचा थेट इशारा

English Summary: This is the news for those who can't afford milk in the business! Patha has taken four acres of land.. Published on: 04 May 2023, 12:34 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters