कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी जगात प्रत्येक स्तरावरून प्रयत्न चालू होते. देशात सर्वत्र लॉकडाउन लावण्यात आले होते. यामुळे कोरोनावर मात तर करता आली मात्र लॉकडाउनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली. देशातील लाखो लोकांनी विशेषतः मजदूर लोकांनी आपले नोकरी गमावली. एकीकडे काही लोकांवर रोजी रोटीवर गदा आली असताना दुसरीकडे झारखंड येथील शेतकरी दांपत्यांसाठी कोरोना वरदान बनले आहे.
झारखंडमधील रावतारा गावांत राहणारे ३७ वर्षांचे किसान सूर्य मंडी लॉकडाउनमुळे आपल्या घरी आले होते. त्यावेळी कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने त्यांना घर खर्चही भागवणेही कठीण झाले होते. या परिस्थितीत त्यांनी स्वतः शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला निर्णय आज त्यांना लखपती बनवत आहे. आपली पत्नी रुपालीच्या समवेत त्यांनी मिश्र शेती करून संपूर्ण गावात एक मिसाल कायम केली. आजच्या काळात हे शेतकरी दांपत्य लोकांसाठी प्रेरणा देणार ठरलं आहे.
किसान सूर्य मंडी हे आपल्या शेतात केवळ धानची शेती करत होते. मात्र लॉकडाउनमध्ये त्यांनी धानच्या शेतीबरोबर अनेक भाज्यांची मिश्रित शेती केली. ज्यातून त्यांना अधिक फायदा झाला. किसान मिश्रित शेती गेले २ वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या या मिश्र शेतीव्यवसायामुळे त्यांना द्विगुणित नफा होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मिश्र शेतीतून मिळालेला मुनाफा आणि प्रसिद्धी आता गावातील लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यांच्याकडून प्रभावित होऊन लॉकडाउनमध्ये नोकरी गमावलेल्या मजुरांनी मिश्र शेती करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना बराच आर्थिक फायदा झाला.
ग्रामीण शेतकऱ्यांची सफलता पाहून झारखंड सरकार कृषि उत्पादनाच्या वाढीसाठी नवनव्या तंत्रांचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्याशिवाय शेतात सिंचनासाठी चांगल्या सुविधांचा पाठपुरवठा देत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
जंगल जलेबी फळाचे फायदे तोटे माहित आहेत? वाचून वाटेल आश्चर्य...
आता पशुधन विमा योजना लवकरच होणार सुरु, अनेकांना होणार फायदा
आडसाली उसाची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, अशा पद्धतीने नियोजन केल्यास मिळेल भरपूर उत्पादन
Share your comments