कृषि महाविद्यालय पुणे येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तामिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय व्यवस्थापन बैठक २०२२ मध्ये सहभागी झाले होते.सदर बैठकित प्रबंदाज २०२२ घटकांतर्गत व्यवसाय नियोजक म्हणून शैंकी कुमार पुरूषोत्तम आणि कृष्णा देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. उत्तम व्यवस्थापक म्हणून अमित पाटील आणि मनुष्यबळ व्यवस्थापन स्पर्धेत कु श्रेया फडतरे आणि
आकाश क्षिरसागर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालया साठी हा क्षण खूप ऐतिहासिक व अविस्मरणीय आहे.कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयामध्ये उच्च शिक्षण घेत असताना अश्या कार्यक्रमध्ये विधर्थ्यांचा सहभाग वाढणं ही काळाची गरज आहे.नेमकी हीच बाब हेरून कृषी महाविद्यालयातील विध्यार्थी ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विधर्थ्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीला यश मिळाल्याची भावना कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय भोसले यांनी व्यक्त केली आहे.
व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय भोसले यांनी व्यक्त केली आहे. तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. व्ही. गीतालक्ष्मी यांनी कृषि महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्याचे त्यांच्या यशाबद्दल आणि शिस्तबद्ध वागणुकीबाबत विशेष कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.सदर स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिना कृषी महाविद्यालय पुणे चे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सुनील मासळकर, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय भोसले याचे मार्गदर्शन लाभले आहे.
सदर बैठकित प्रबंदाज २०२२ घटकांतर्गत व्यवसाय नियोजक म्हणून शैंकी कुमार पुरूषोत्तम आणि कृष्णा देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. उत्तम व्यवस्थापक म्हणून अमित पाटील आणि मनुष्यबळ व्यवस्थापन स्पर्धेत कु श्रेया फडतरे आणि आकाश क्षिरसागर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालया साठी हा क्षण खूप ऐतिहासिक व अविस्मरणीय आहे.कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयामध्ये उच्च शिक्षण घेत असताना अश्या कार्यक्रमध्ये विधर्थ्यांचा सहभाग वाढणं ही काळाची गरज आहे.
या यशाबद्दल सहभागी स्पर्धकांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु मा.प्रशांतकुमार पाटील यांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
Share your comments