सध्या भारतात गव्हाचा साठा कमी झाला आहे. सरकारी गोदामातील गव्हाचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. येत्या काही दिवसांत गहू आणि त्याच्या उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय शेतकऱ्यांनी १ ऑक्टोबरपासून ४.५ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे. स्थानिक गव्हाच्या किमती गुरुवारी 26,500 रुपये ($324) प्रति टन विक्रमी पोहोचल्या आहेत.
जे मे मध्ये निर्यातीवर बंदी आल्यापासून जवळपास 27% जास्त आहे. सरकारच्या गोदामांमध्ये गहू आणि तांदूळ या दोन्हींचा समाधानकारक साठा असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र आता नवीन गहू बाजारात येईपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत सरकारी धान्य कोठारात गव्हाचा साठा 22.7 दशलक्ष टन होता.
असे असताना त्यानंतर केंद्र सरकारने किरकोळ बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू सोडला. तरीही, सरकार नियमितपणे पीठ आणि बिस्किट उत्पादकांसारख्या मोठ्या खरेदीदारांसाठी गहू जारी करते. यामुळेच सरकारी गव्हाचा साठा कमी झाल्याचे सांगितले जात आहे. पुढील वर्षी नवीन हंगामाचे पीक बाजारात येईपर्यंत भारतीय गव्हाचे भाव चढेच राहण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आता मिळणार 4 लाख, अनुदानात मोठी वाढ
हवामानाची परिस्थिती अनुकूल राहिली आणि मार्च आणि एप्रिल कापणीदरम्यान तापमानात असामान्य वाढ झाली नाही, तर भारताचे गव्हाचे उत्पादन 2021 मध्ये 109.59 दशलक्ष टनांच्या पातळीवर परत येऊ शकते. यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांना भेट, आता खात्यात येणार 15 लाख
असे असले तरी सरकारच्या गोदामांमध्ये गहू आणि तांदूळ या दोन्हींचा समाधानकारक साठा असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याचे दर वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महागाईमुळे आधीच सर्वसामान्य जनता हैरान झाली आहे. यामुळे नागरिक नाराज आहेत.
महत्वाच्या बातम्या;
टोमॅटोचे दर घसरले, खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत
पालकांनो लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर ही बातमी वाचाच..
राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्षाला रामराम, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का
Share your comments