1. सरकारी योजना

शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आता मिळणार 4 लाख, अनुदानात मोठी वाढ

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा हा या मागचा उद्देश असतो. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींबाबत (Irrigation Well) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
digging wells subsidy

digging wells subsidy

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा हा या मागचा उद्देश असतो. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींबाबत (Irrigation Well) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच यामध्ये दोन विहिरींतील अंतराची अट शिथिल केली आहे. तसेच यासाठी ३ लाखांवरून चार लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना एका गावात कितीही विहिरी घेता येणार आहेत. यामुळे याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

सिंचन क्षेत्रातही वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. भूजल सर्वेक्षणानुसार राज्यात अजून सुमारे ३ लाख ८७ हजार ५०० विहिरी खोदणे शक्य आहे.

'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'

प्रत्येक शेतकरी कुटुंबाला चार पैसे मिळण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.

शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..

यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, शारीरिक विकलांग व्यक्तींकरिता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी अधिनियमानुसार लाभार्थी, सीमांत शेतकरी भूधारणा अडीच एकर, अल्पभूधारक लाभ घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या;
पॉलिहाऊस, शेडनेटच्या नादी लागले आणि आज घरदार विकायची वेळ आली, अनेकांच्या आत्महत्या
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळणार खत
शेतकऱ्यांची वीज पुन्हा तोडण्यास सुरुवात, पिके लागली जळू

English Summary: 4 lakhs for digging wells, a huge increase in subsidy Published on: 15 November 2022, 01:01 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters