सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले येथील कृषी पदवीधर, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, कृषी जागरणचे पत्रकार (Journalist of Krishi Jagran) आणि युवा शेतकरी गोपाल नरसिंग उगले यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Krishiratna award) प्रदान करण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस) माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांच्या हस्ते, कृषी क्षेत्रातील विशेष कार्य कृषी पदवीधर व तज्ञ म्हणून नावलौकिक असलेले गोपाल उगले यांना कृषिरत्न पुरस्कार (Krishiratna award) प्रदान करण्यात आला. कृषी जागरण मिडिया, दिल्ली यांच्याकडून गोपाल उगले यांचे अभिनंदन..!
कृषीरत्न पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम २१ मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉल, मुंबई या ठिकाणी पार पडला. महाराष्ट्रतील एकूण 26 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष मा. प्रकाश दादा साबळे यांनी हे पुरस्कार जाहीर केले होते.
शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या सेवेत
गोपाल उगले हा गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जैविक शेती व नवनवीन तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन आतापर्यंत करत आले आहेत.
शेतकऱ्यांना फोनवर, वर्तमानपत्रात अग्रलेख, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीतून शेतकरयांना मार्गदर्शन करत आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, शेतीचा खर्च कमी करणारे घटक, जैविक शेती, याबाबत प्रामुख्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन त्यांनी केले आहे.
Ujwala Yojana Breaking: एलपीजी गॅस सिलेंडर 200 रुपयांनी होणार स्वस्त, केंद्र सरकारची मोठी घोषणा
शेतकरी पुत्र अनेक पुरस्कारांचा मानकरी
1) राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार प्रदान
2) सन 2021-22 मध्ये मी केलेल्या जैविक शेती प्रबोधनात्मक लेख लिहून व कृषितंत्राचा प्रसार केल्याबद्दल विद्यापीठ स्तरीय स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
3) सतत दोन वर्षापासून शेतीक्षेत्रामध्ये आणि समाजासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
4) गावातील शेतकऱ्यांना पिक तंत्रज्ञान, पीक बदल, जैविक शेती, प्रक्रिया उद्योग या बाबत मार्गदर्शन करत असल्याने ग्रामपंचायत पांगरी उगले यांच्या यांच्या माध्यमातुन सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नाथाभाऊंनी करून दाखवले!! 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन..
सतत दोन वर्षापासून शेतीक्षेत्रामध्ये आणि समाजासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. प्रबोधनात्मक लेख लिहून व कृषितंत्राचा प्रसार केला आहे. गावातील शेतकऱ्यांना पिक तंत्रज्ञान, पीक बदल, जैविक शेती, प्रक्रिया उद्योग या बाबत मार्गदर्शन केले.
गोपाल उगले यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे ही बाब तालुक्यासाठी व गावासाठी अभिमानास्पद असल्याने गोपाल उगले यांच्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
Monsoon Updates: आला आला रे आला मान्सून आला ! कोकणातील मान्सूनची तारीख ठरली..!
Share your comments