राज्य सरकारचा निर्णय ; बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत

18 April 2020 09:28 PM


कोरोनाने (corona virus)  राज्यात धुमाकूळ घातला असून राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद आहेत.  यामुळे मजूर कामगारांचे मोठे हाल होत असून त्यांच्या समोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.  शेतकऱ्यांसाठी व  शेत मजुरांसाठी केंद्र सरकारने अनेक योजनांमधून मदत केली आहे. आता राज्यातील सरकारने बांधकाम कामगारांना  मदत केली आहे.  कोरोनाच्या संकटसमयी सरकारची बांधकाम कामगारांना केलेली मदत फार महत्त्वाची आहे. लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद आहेत, त्यामुळे मजुरांवर बेकारीचे संकट ओढवले आहे.

दरम्यान राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक अडचण भेडसावत आहे. त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मंडळातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना रुपये २ हजार रुपये आर्थिक साहाय्य थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात डीबीएट पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करुन मंडळाकडे जमा करण्यात येतो.  मंडळाकडे जमा उपकर निधीतून नोंदीत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भभवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत राज्यातील १२ लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे. सदरचे आर्थिक साहाय्य नोदींत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. याविषयीची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.  या मजुरांच्या हक्काचा पैसा महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळामध्ये जमा असून तो ९ हजार कोटींच्या घऱात आहे.  बांधकाम व्यावसायिकांकडून सेसच्या रुपात ही रक्कम सरकार जमा करवून घेते.  त्यामुळे बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत, असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागााने मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला होता.  त्यानुसार अखेर मदतीच्या स्वरुपात दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

state government aid to constructions workers maharashtra government thackeray government dilip valse-patil covid 19 lockdown construction worker कोरोना व्हायरस कोविड-19 बांधकाम कामगार राज्य सरकारची बांधकाम कामगारांना मदत दिलीप वळसे-पाटील उदधव ठाकरे मुख्यमंत्री ठाकरे ठाकरे सरकार महाराष्ट्र सरकार
English Summary: state government aid to 2 thousand rupees per constructions workers

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.