
state goverment do some change in land fragment law so faliciatate to land purchasing to farmer
महाराष्ट्र राज्य सरकारने जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे शेत जमीन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या नवीन महत्त्वपूर्ण निर्णयामुळेशेतीसाठी जे काही निश्चित केलेले प्रमाणभूत क्षेत्र होते ते आता कमी करण्यात आले आहे. जर आपण पूर्वीच्या तुकडेबंदी कायद्याचा विचार केला तर यामध्ये प्रत्येक तालुक्यानुसार प्रमाणभूत क्षेत्र हे निश्चित करण्यात आलेले होते. परंतु आता यामध्ये संपूर्ण राज्यासाठी एकच समान प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले असून या निर्णयामुळे आता जिरायत जमीन कमीत कमी वीस गुंठे आणि बागायत जमीन हे दहा गुंठे खरेदी करता येणार आहे.
हा निर्णय फक्त ग्रामीण भागातील शेतजमीन साठी लागू असणार
राज्य शासनाने तुकडेबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला परंतु यामध्ये विशेष लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा निर्णयमहानगरपालिका व नगरपालिका हद्दीसाठी लागू असणार नसल्याचे देखील अधीसूचनामध्ये म्हटले आहे.म्हणजे या अधिसूचनेनुसार फक्त ग्रामीण भागातील शेतजमीन साठी हा निर्णय असणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी जे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते हे क्षेत्र कमी करण्याच्या विषयी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. एवढेच नाही तर जिल्हा सल्लागार समित्या सोबत विचार मंथन करून सरकारने हा निर्णय घेतला असून यासंबंधीचे आदेश राज्य सरकारचे उपसचिव संजय बनकर यांनी काढले आहेत. राज्य शासनाने जो काही हा निर्णय घेतला आहे यावर शासनाने नागरिकांकडून काही हरकती असतील, काही सूचना असतील त्या देखील मागवले आहेत. ज्या कोणाला या हरकती किंवा सूचना मांडायचे असतील ते अतिरिक्त मुख्य सचिव( महसूल ) मंत्रालय मुंबई 400032 यांच्याकडे दाखल करू शकणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:उन्हाळी सोयाबीन बियाणे प्रकरणी चौकशी करून मदत देण्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन
Share your comments