1. बातम्या

उन्हाळी सोयाबीन बियाणे प्रकरणी चौकशी करून मदत देण्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

यावर्षी महाबीज कडून सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना सोयाबीनचे के डी एस 726 या सोयाबीनच्या जातीचे बियाणे देण्यात आले होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
unsuperior soyabean seeds problem

unsuperior soyabean seeds problem

 यावर्षी महाबीज कडून सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना सोयाबीनचे के डी एस 726 या सोयाबीनच्या जातीचे बियाणे देण्यात आले होते.

 परंतु शेतकर्‍यांना देण्यात आलेले बियाणे सदोष असल्यामुळे अशा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली. सदर प्रकरणाविरोधी धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. या दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून या संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीज चे सर्व अधिकारी तसेच धनगाव (तालुका पलूस ) येथील शेतकरी उपस्थित होते.

 याप्रसंगी मुदत संपून देखील परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणे प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल व त्या अनुषंगाने मदत देऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली. त्यासोबतच शेतकऱ्यांनी पेरलेल्या या के डी एस 726 जातीच्या वानामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्या सगळ्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली जाईल.

हे स्थापन केलेली चौकशी समिती या गोष्टीचा अभ्यास करून शासनाकडे त्यासंबंधीचा अहवाल सादर करेल व त्यानंतर शेतकऱ्यांना मदतीबाबत दिलासा देण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:बातमी कामाची! बारामाही मागणी असलेल्या या विदेशी फळाची शेती करा आणि कमवा बक्कळ; वाचा सविस्तर

नक्की वाचा:Mansoon 2022: शेतकऱ्यांनो सुरु करा खरीपाची तयारी; मान्सून वेळेआधीच आगमनाच्या तयारीत; वाचा IMD चा ताजा अंदाज

नक्की वाचा:Top 5 Agri Bussiness Idea:हे 5 शेतीशी निगडित व्यवसाय शेती सोबत देतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग

English Summary: establish inquiry commity for unsuperioer soyabioen seeds crop and that take decision Published on: 12 May 2022, 10:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters