शेतीमधून उत्पन्न भेटत नसेल तर आजिबात चिंता करू नका कारण आज आम्ही तुम्हाला अशा शेतीबद्धल माहिती देणार आहोत ज्या शेतीला फक्त ५० हजार रुपये खर्च आहे जे की पुढील ३ वर्षापर्यंत तुम्हाला प्रति वर्ष ५ लाख रुपये भेटतील. आम्ही ज्या शेतीबद्धल बोलत आहोत ती म्हणजे कोरफडीची शेती. कोरफड मध्ये अनेक औषधी (medicine) गुण तसेच सौंदर्य उत्पादनासाठी वापरली जाते आणि यामुळे बाजारामध्ये कोरफडीचा मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे ज्यामुळे तुमची आर्थिक गरज चांगल्या प्रकारे भागू शकते.
कोरफडीतून व्यवसाय करून दोन प्रकारे कमाई करता येते:-
भारतात तर मोठ्या प्रमाणात कोरफडीची मागणी आहेच याव्यतिरिक्त परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा कोरफडीचा स्थान आहे. भारतामध्ये कोरफडीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते जे की देशातील कंपन्या त्यापासून वेगवेगळी सामग्री बनवून बाहेरच्या देशाला विकतात. कोरफडीचा व्यवसाय तुम्ही दोन प्रकारे करू शकता ज्यामध्ये एक प्रकार असा की प्रथम कोरफडीची लागवड करणे आणि दुसरा व्यवसाय म्हणजे पावडर तयार करण्यासाठी किंवा रसासाठी.
हेही वाचा:आता शेतकरी स्वतःच करणार पीक नोंदणी, मात्र हे ॲप डाउनलोड करावे लागणार
किती खर्च येईल आणि किती कमाई होईल?
कोरफड लागवड करायची असेल तर त्यास प्रति एकर ५० हजार रुपये खर्च येतो जो की एका वर्षासाठी लागवड केली तर तुम्ही ३ वर्ष त्याची कापणी करू शकता. दरवर्षी किमंत वाढतच जाते त्यामुळे चांगल्या प्रकारे कमाई होते. तुम्ही हे कोरफड कंपन्या तसेच मंडई मध्ये सुद्धा जाऊन विकू शकता आणि जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी एक छोटे प्रोसेसिंग युनिट उभा करून त्यामध्ये तुम्ही कोरफड पासून जेल किंवा रस विकून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता पण ते छोटे प्रोसेसिंग युनिट उभा करायचे असेल तर त्यास ५ लाख रुपये खर्च येतो.
कोरफड वनस्पतीस जमीन व खर्च:
सुपीक जमीन तसेच कमी खत आणि चांगले उत्पादन. जर चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर १० - १५ टन कुजलेले खत लागेल. तुम्हाला जर चांगला नफा हवा असेल तर प्रथम लागवडी नंतर जो खर्च येणार आहे जे की वनस्पती, कष्ट आणि पॅकिंगला लागणार खर्च. तुम्ही कमी खर्चामध्ये सुद्धा हॅन्डवॉश तसेच कॉस्मेटिक सुद्धा तयार करून विकू शकता तसेच कोरफड ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शॅम्पू ला सुद्धा बाजारामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Share your comments