1. बातम्या

आता शेतकरी स्वतःच करणार पीक नोंदणी, मात्र हे ॲप डाउनलोड करावे लागणार

यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात बारा वर पिकांची नोंदणी करणे हे तलाठ्यांच्या हातात होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सारखे तलाठी कार्यलयात फेर फटके मारायला लागत होते आणि नंतर मग तलाठी शेतीमध्ये जायचे आणि पाहणी करायचे.पाहणी करून सुद्धा तलाठी कधी कधी कापूस ऐवजी सोयाबीन तर कधी धाना ऐवजी गहू या पिकाची चुकीच्या पद्धतीनं नोंदणी करायचे आणि नंतर मग शेतकऱ्यांना याचा संताप होयचा आणि शेतकऱ्यांची ओरड सुरू होयची.

किरण भेकणे
किरण भेकणे
farmer

farmer

यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात बारा वर पिकांची नोंदणी करणे हे तलाठ्यांच्या  हातात होते आणि त्यासाठी  शेतकऱ्यांना सारखे तलाठी   कार्यलयात  फेर फटके मारायला लागत होते आणि नंतर मग तलाठी शेतीमध्ये जायचे आणि पाहणी करायचे.पाहणी करून सुद्धा तलाठी कधी कधी कापूस ऐवजी सोयाबीन तर कधी धाना ऐवजी गहू या पिकाची चुकीच्या पद्धतीनं नोंदणी करायचे आणि नंतर मग शेतकऱ्यांना याचा संताप होयचा आणि शेतकऱ्यांची ओरड सुरू होयची.

सात  बारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी:

महसूल  विभागाने  डिजिटल तंत्र वापरून नवीन ई - पीक हे ॲप(app)  तयार केले  जे की  अत्ता  शेतकरी स्वतः  आपल्या  मोबाईल हे  ॲप  डाऊनलोड  करून  त्यांच्या पिकांचे फोटो (photo) अपलोड करून पिकांची  नोंदणी करणार  आहेत. ई - पीक ॲप हे १५ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना वापरण्यास सुरू झाले आहे.सात  बारा  उताऱ्यावर  पिकांची  नोंदणी करण्याची  पद्धत अशी आहे की शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी  किंवा वादळामुळे झालेले पिकाचे नुकसान आणि याचाच अंदाज लावून शेतकरी त्यांच्या सात बारा उतात्यावर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते.

हेही वाचा:वाशीम जिल्ह्यामध्ये या कारणामुळे घटले सोयाबीन पिकाचे ९० टक्के उत्पादन, सोयबीन दरात सुद्धा मोठी घसरण

यापूर्वी सात बारा उताऱ्यावर तलाठी नोंदणी करायचे पण एका तलाठी कडे २ - ३ ग्रामीण भाग असतात त्यामुळे त्याचा भार त्यांच्यावर खूप असतो. आणि याच मुळे तलाठी कधी एका गावाला तर कधी दुसऱ्या गावाला जातात आणि शेतकऱ्यांच्या काही नोंदी अडकून राहतात त्यामुळे  शेतकरी अडचणीत  येतात. अनेक वेळा तलाठी वर्गाकडून सात बारा वर चुकीच्या पद्धतीने नोंदणी होतात त्यामुळे अत्ता महसूल विभागाने टाटा ट्रस्ट च्या मदतीने ई-पीक पाहणी  साठी  मोबाईल ॲप तयार केले आहे आणि याच ॲप च्या मदतीने शेतकरी आत्ता स्वतः त्यांच्या शेतातील पीक नोंदणी करू शकतात आणि पिकांचे फोटो सुद्धा अपलोड करू शकतात.

अशा प्रकारे करा पीक नोंदणी:-

तुम्ही ई पीक हे ॲप तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करू शकता, जे की डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये जी माहिती भरायची आहे ती खातेदार म्हणून नोंदणी करायची त्यानंतर मोबाईल वर चार अंकी ओटीपी येईल तो टाकावा आणि त्या नंतर पीक पेरणी ची माहिती भरा. तुम्ही पिकाचा फोटो अपलोड करा आणि शेतीमध्ये पिके असतील तेवढ्या पिकांची नोंदनी करावी. तुम्हाला जर ॲप मध्ये माहिती  भरण्यास  काही  अडचण  आली तर  तुम्ही थेट तलाठी किंवा कृषी सहायकशी संपर्क करावा.ई - पीक या ॲपद्वारे शेतकरी स्वतःच्या पिकाची नोंदणी स्वतः करू शकतात आणि तेही अचूक पद्धतीने नोंदणी होईल. तसेच नैसर्गिक आपत्ती काळात नुकसान भरपाई आणि पीकविमा सुद्धा मिळणे सोपे होणार आहे.

English Summary: Now farmers will register their crops themselves, but they will have to download this app Published on: 16 August 2021, 07:41 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters