गेल्या काही दिवसांमध्ये साखर कारखानदारीवर अनेक संकटे आली आहेत. यामुळे अनेक कारखाने देखील बंद पडले आहेत. यामुळे अनेक कारखाने हे कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील देऊ शकते नाहीत. यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. यावर आता माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, सध्या एक नवीन प्रश्न निर्माण झालाय. बंद पडलेल्या कारखान्याचे काय करायचे हा प्रश्न मोठा बनलाय.
कामगारांचे पगार थकलेत. कारखान्यातील मशिनरी गंजून जायला लागली. त्याकडे कुणी बघत नाही, मशिनरीच्या पार्ट्सची चोरी होते. त्यामुळे बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काम काही लोक करतात. साखरेचा धंदा एकेकाळी ऊसापासून साखर करण्यापर्यंतचा होता. अगदी सुरुवातीला जे कारखाने निघाले, ते खासगी होते, असेही ते म्हणाले.
तसेच वालचंदनगरच्या कारखान्यामुळे ऊसाच्या धंद्याला एक नवीन दृष्टिकोन आला. यामध्ये धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विठ्ठलराव विखे अशी दूरदृष्टी असलेले लोक आपल्याला नगर जिल्ह्यातून मिळाले आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर येथे झाला. वसंतराव पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे अशा अनेक लोकांनी या कामात योगदान दिले. अनेकांची नावे घेता येतील, असेही ते म्हणाले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बच्चू कडू फोन करून म्हणाले, थोबाडीत मारल्याशिवाय..
आज कारखानदारीमध्ये गुणात्मक बदल झाला आहे. एकेकाळी नुसती साखर एके साखर हाच कारखाना होता. आज त्याठिकाणी साखर, डिस्टिलरी, इथेनॉल, वीज तयार केली जात आहे. मुंबईत १२० कापड गिरण्या होत्या. आज मुंबईत फक्त एक गिरणी शिल्लक आहे. अशा परिस्थितीतही ऊसाचा धंदा टिकून आहे आणि तो वाढतोय. त्याचे श्रेय त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना द्यावे लागेल.
यंदा 42 हजार कोटींची एफआरपी FRP, विक्रमी गाळपामुळे विक्रमी वाढ
जे कारखाने सुरू करणे शक्य आहे, ते सुरू करावे लागतील. बंद का पडले, याच्या खोलात जावे लागेल. कारखाना जसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तसा तो तिथे काम करणाऱ्या कामगारांसाठी देखील महत्त्वाचा आहे. सहकार मंत्री आणि कामगार मंत्री यांनी पुढाकार घेऊन साखर आयुक्त, कामगार आयुक्त, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि आवश्यकता असल्यास मला बोलावून बंद पडलेल्या कारखान्यांबाबत निर्णय घेऊ, असेही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
लूज कांदा विक्रीमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन! कांद्याचा वांदा मिटणार
महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बच्चू कडू फोन करून म्हणाले, थोबाडीत मारल्याशिवाय..
अजितदादांच्या शेतीविषयक अभ्यासामुळे अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ, अधिकाऱ्यांपुढे प्रश्नांचा पाऊस..
Share your comments