1. बातम्या

महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बच्चू कडू फोन करून म्हणाले, थोबाडीत मारल्याशिवाय..

बच्चू कडू यांनी एका महावितरणच्या (mahadiscom officers) अधिकाऱ्याला काम न झाल्यास थोबाडीत मारेन, अशी फोनवर धमकीच दिल्याचे समोर आले आहे. यामुळे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bachchu Kadu management MSEDCL

Bachchu Kadu management MSEDCL

अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किंवा इतर प्रश्नासाठी राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कायम संघर्ष झाल्याचे आपण बघितले आहे. बच्चू कडू वेगळ्या पद्धतीने आंदोलने देखील करतात. असे असताना आता असेच काहीसे पुन्हा एकदा घडले आहे. बच्चू कडू यांनी एका महावितरणच्या (mahadiscom officers) अधिकाऱ्याला काम न झाल्यास थोबाडीत मारेन, अशी फोनवर धमकीच दिल्याचे समोर आले आहे.

यामुळे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बच्चू कडू यांच्या हस्ते संग्रामपूरला रुग्णवाहिनीचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ही घटना घडली आहे. यावेळी एक शेतकरी त्यांच्याकडे गेला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. नंतर बच्चू कडू यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला फोन करून चांगलेच फैलावर घेतले.

ते म्हणाले, महावितरणचा कोण अभियंता आहे, पाच-पाच वर्ष काम करत नाही. वाटतंय काय त्याला, आज उद्या हे काम केलं पाहिजे. नाहीतर तिथे येऊन थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांमध्ये फक्त दीड लाख रुपये खर्च केला, जोडणी करण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे.

दुचाकी चारचाकी खरेदी करायची असेल तर 1 जून आधी करा, किमतीमध्ये होणार मोठी वाढ

तसेच दोन दिवसांपूर्वी भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धरले धारेवर धरले होते. केवळ रस्त्याची कामे याबाबत प्राधान्य असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना रमाई योजना पंतप्रधान योजनेचा विसर पडल्याने बच्चू कडू यांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी त्यांना सांगितल्याने ते चांगलेच संतापले होते.

महत्वाच्या बातम्या;

लूज कांदा विक्रीमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन! कांद्याचा वांदा मिटणार
शेतकऱ्यांनो आता व्यापारीच व्हावे लागेल! मग म्हणा आख्ख मार्केट आता आपलंय, वाचा शेतकऱ्याचा प्रयोग
शेताला कुंपण घालण्यासाठी सरकार देणार 48 हजार रुपये, जनावरांपासून होणार सुटका

English Summary: management MSEDCL officials, Bachchu Kadu without killing him in the mouth .. Published on: 29 May 2022, 10:33 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters