महाविकास आघाडी सरकारने FRP चे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली नाही. याबाबत न्यायालयात दाद मागितली. कारखानदार भामटे आहेत, चोर आहेत. यामुळे पुढील गळीत हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात कॅनॉलचे अस्थिरीकरणाचा विषय चांगलाच पेटला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. कॅनॉलचे अस्थिरीकरणाला शेतकऱ्यांचा चांगलाच विरोध होत आहे. यावर आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राजू शेट्टी यांनी देखील याला विरोध केला आहे. कॅनॉलचे अस्थिरीकरण (Destabilization of the canal) गरजेचे होते तर 15 वर्ष सरकार होत तेव्हा का केलं नाही? अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो. तो का असतो हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये
राजू शेट्टी म्हणाले, इंग्रजांनी ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात कॅनॉलने (canal) पाणी नेले. कॅनॉलच्या आसपासच्या शेतीला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. कॅनॉल हा उंचावर असतो. आता धरणे फुटत आहेत. फुटण्याच कारण सांगितले जात की खेकडयाने धरण फोडले.
तसेच शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा उद्योग कोणी केला हे आम्हाला चांगले माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा कालवा चालू आहे. आत्ताच हा कालवा तयार झाला, असं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जे पाणी शेतकऱ्यांसाठी आरक्षित होतं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बिगर शेती करण्यासाठी वापर झाला आहे.
अरे व्वा! आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये
त्यानंतर शेतीला पाणी कमी पडल्यानंतर त्याचे खापर गळतीवर फोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. इंग्रजाच्या काळात बांधलेले कालवे उत्तम प्रतीचे आहेत.मात्र अलीकडच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये जे कालवे बांधलेत, त्यांची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी
देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments