Mumbai : आजकाल भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढले आहे. चहा पावडर मध्ये भेसळ करणाऱ्या दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.शिवडी भागातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन तरुणांनी चहा पावडरमध्ये सुगंधी रसायन पावडरची (Adulterated Tea Powder) भेसळ करून ती शहरातल्या विविध किरकोळ विक्रेत्यांना त्याचा पाठ पुरवठा केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
धक्कदायक बाब म्हणजे पोलिसांनी या दोन व्यक्तींकडून भेसळयुक्त चहा पावडरचा जवळपास 85 हजार रुपये किमतीचा तब्बल 430 किलोचा साठा जप्त केला आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. लोक खाद्यपदार्थात भेसळ करून अधिकाधिक पैसे कमावण्यासाठी असा प्रकार करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र पैसे कमावून लोकांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे.
शिवडी भागातल्या रामगड झोपडपट्टीतल्या एका गोडाउनमध्ये चहा पावडरमध्ये भेसळ करण्याचा उद्योग सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर 14 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तिथे धाड टाकली. यातून 26 वर्षांचा राहुल शेख व 29 वर्षांचा राजू शेख या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातून त्या दोघांकडेही चहा पावडर विकण्याचा किंवा साठवण्याचा कोणताही परवाना नव्हता, असंही उघड झालं.
आता मोठ्या दोन बँकांचे होणार खाजगीकरण? खातेधारकांना मोठा धक्का
पोलिसांनी भेसळयुक्त चहा पावडरचा 85 हजार रुपये किमतीचा 430 किलो साठा जप्त केला असून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, ट्रेडर्स चेक बुक, फाइल्स व स्टॅम्प पॅड इ. साहित्यही आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात 15 मे रोजी FIR दाखल करण्यात आली. भारतीय दंडविधानातलं कलम 328 (विषबाधा), 272 (विक्रीसाठीच्या अन्नधान्यात भेसळ), 273 (भेसळयुक्त अन्नाची विक्री,) 420 (फसवणूक) यांसह अन्नसुरक्षितता आणि मानके कायद्यातल्या विविध कलमांतर्गत हा FIR दाखल करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षितता कायद्यानुसार उत्पादक, पॅकर्स, होलसेलर्स, वितरक आणि विक्रेते यांपैकी कोणाकडेही भेसळयुक्त, असुरक्षित खाद्यान्नाचा साठा असेल किंवा परवाना न घेता कोणी व्यवसाय करत असेल, तर तो गुन्हा ठरतो. शिवडी पोलिस स्टेशनमधले वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सैंद्रे यांनी या संपूर्ण घटनेबद्दल माहिती दिली.
'आरोपी चहा पावडरमध्ये रसायनाची भेसळ करत असल्यामुळे त्या चहा पावडरला एक प्रकारचा विशिष्ट गंध आणि स्वाद येत होता. अशी ही भेसळयुक्त चहा पावडर साहजिकच ग्राहकांच्या आरोग्याला हानी पोहचवणारी होती. त्यामुळे आम्ही अन्नसुरक्षितता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी धाड टाकून हा कारोबार रंगे हाथ पकडला.
महत्वाच्या बातम्या:
Sarkari Yojana Information: 'या' सरकारी योजनेचा लाभ घ्या; 1 रुपयात मिळणार 2 लाखांचा विमा; वाचा सविस्तर
‘या’ झाडाची शेती बनवणार मालामाल; एकच झाड विकले जाते 50 हजाराला; वाचा याविषयी
Share your comments