1. कृषीपीडिया

‘या’ झाडाची शेती बनवणार मालामाल; एकच झाड विकले जाते 50 हजाराला; वाचा याविषयी

शेती व्यवसायात जर यशाला गवसणी घालायची असेल तर त्यामध्ये काळाच्या ओघात आणि बाजारात असलेल्या मागणीनुसार बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बाजारात ज्या पिकाला मागणी असते त्याच पिकाची शेती केली तर निश्‍चितच शेतकऱ्यांना चांगला बक्कळ पैसा मिळू शकतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
start palm tree farming and became millionaire

start palm tree farming and became millionaire

शेती व्यवसायात जर यशाला गवसणी घालायची असेल तर त्यामध्ये काळाच्या ओघात आणि बाजारात असलेल्या मागणीनुसार बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बाजारात ज्या पिकाला मागणी असते त्याच पिकाची शेती केली तर निश्‍चितच शेतकऱ्यांना चांगला बक्कळ पैसा मिळू शकतो.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल करण्याचा अनमोल सल्ला देत असतात. हीच बाब लक्षात घेता आज आपण देखील बाजारात बारामही मागणी असलेल्या खजूर या पिकाच्या शेती विषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता आज जाणून घेऊया खजूर शेती विषयी महत्त्वपूर्ण माहिती.

मित्रांनो आम्ही तुमच्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की, जर तुम्ही खजुर शेती करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला लागवडीचा खर्च खुपच नगण्य येणार आहे.  कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, एका खजूरच्या झाडापासून 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई सहज केली जाऊ शकते. मात्र यासाठी योग्य नियोजन असणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर खजूर लागवड केली आणि योग्य नियोजन केले तर शेतकरी बांधव मोजून काही वर्षात करोडपती बनू शकतो.

आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळतील 29 हजार 700 रुपये; वाचा याविषयी

मित्रांनो खजुर शेती करायची असेल तर याची लागवड पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या आणि वालुमिश्रित असलेल्या शेतजमिनीत करावी असा सल्ला दिला जातो. खजूरची झाडे चांगली वाढण्यासाठी, 30 अंश तापमान आवश्यक असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात. याशिवाय खजूरचे फळ पिकण्यासाठी 45 अंश तापमान आवश्यक असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक स्पष्ट करतात. एकंदरीत प्रखर उन्हात खजूरचे झाड चांगले विकसित होत असून या पासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येते.

Urad Farming: अशी करा उडीद लागवड; अन मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी

खजूर शेतीसाठी आवश्यक पूर्वमशागत

खजूर शेतीसाठी पूर्व मशागत देखील करावी लागते. जसं की याच्या चांगल्या विकासासाठी वालुकामय आणि भुसभुशीत माती लागते. अशा परिस्थितीत याची लागवड कारण्यापूर्वी चांगल्या तर्हेने शेत तयार करणे अतिशय आवश्यक आहे.

पूर्व मशागत करण्यासाठी सर्वप्रथम शेतजमीन पल्टी नांगराच्या सहाय्याने खोल नांगरून घेणे अतिशय महत्वाचे आहे. पहिली नांगरणी केल्यानंतर काही काळ शेत तसेच मोकळे सोडा आणि नंतर दोन ते तीन नांगरण्या करा. असे केल्याने शेतातील माती भुसभुशीत होईल.

यानंतर, फळी मारून शेत चांगले समतल करून घ्यावे. असे केल्याने शेतात पाणी साचणार नाही. याशिवाय शेतात ड्रेनेजची उत्तम व्यवस्था करणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे खजूरच्या झाडाचा विकास योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

Crop Damage: उन्हामुळे पिकाच होतेय नुकसान; पण काळजी नको कृषी वैज्ञानिकांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला; वाचा

लागवड कशी करायची

शेतकरी मित्रांनो जर आपणास खजुर लागवड करायची असेल तर त्यासाठी शेतात एक मीटर अंतरावर खड्डे तयार करावे लागणार आहेत. या तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये 25 ते 30 किलो शेणखत आणि माती टाकावी लागणार आहे. या तयार केलेल्या खड्ड्यात आता खजूरचे रोप लावावे लागणार आहे.

खजूरची रोपे लावण्यासाठी ऑगस्ट महिण्याचा कालावधी सर्वात योग्य असल्याचा दावा केला जातो. एक एकर शेतात सुमारे 70 खजुराची रोपे लावता येतात. खजुराचे रोप लावणीनंतर मोजून 3 वर्षांनी उत्पादन देण्यास तयार होत असल्याचे कृषी वैज्ञानिक स्पष्ट करतात.

English Summary: ‘Yaa’ tree farming equipment; A single tree is sold for 50 thousand; Read about it Published on: 18 May 2022, 04:42 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters