1. बातम्या

धक्कादायक! मराठवाड्यात तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या, दररोज दोन जणांच्या आत्महत्या..

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यात तब्बल 214 शेतकऱ्यांनी स्वतःच जीवन संपवून घेतलं आहे. तर मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
214 farmer suicides in Marathwada in three months

214 farmer suicides in Marathwada in three months

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यात तब्बल 214 शेतकऱ्यांनी स्वतःच जीवन संपवून घेतलं आहे. तर मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

यामुळे परिस्थिती खूपच वाईट आहे. सर्वाधिक आत्महत्या बीड (Beed) जिल्ह्यात होत असून, गेल्या 90 दिवसांत बीडमध्ये 65 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिकं वाहून गेली. काही ठिकाणी तर शेतातील माती देखील वाहून गेली.

त्यामुळे झालेल्या या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कर्ज कसे फेडायचं, बँकेकडून सतत सुरु असलेला तगादा, पैश्यासाठी सावकाराकडून होणारी मागणी आणि त्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कुटुंब चालवण्याची चिंता असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे.

कृषिपंपांच्या वीज दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना..

या नवीन वर्षात गेल्या तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सलग तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी कर्ज, नापिकी, नैराश्याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आहे.

उस्मानाबादी शेळीपालनाने शेतकरी होऊ शकतो श्रीमंत, जाणून घ्या काय आहे खासियत

आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही आकडेवारी खूपच मोठी आहे.

शेतकऱ्यांनो जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो मृत्यू...
नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्ती! शेतकरी बसणार उपोषणाला..
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्न स्टारशी संबंध असल्याचा आरोप, जगभरात खळबळ

English Summary: Shocking! 214 farmer suicides in Marathwada in three months, two suicides every day.. Published on: 05 April 2023, 11:07 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters