1. पशुधन

शेतकऱ्यांनो जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो मृत्यू...

अनेकदा उरलेले शिळे अन्न, जादा झालेले अन्न, शिळे अन्न हे घरच्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांच्या आहारात वापरले जाते. काही वेळा भटकी जनावरे ते खातात किंवा खाऊ घातले जाते. याचा मोठ्या प्रमाणावर तोटा देखील आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Feeding stale food to farmers and animals

Feeding stale food to farmers and animals

अनेकदा उरलेले शिळे अन्न, जादा झालेले अन्न, शिळे अन्न हे घरच्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांच्या आहारात वापरले जाते. काही वेळा भटकी जनावरे ते खातात किंवा खाऊ घातले जाते. याचा मोठ्या प्रमाणावर तोटा देखील आहे.

या शिळ्या अन्नाच्या अतिसेवनामुळे जनावरांच्यामध्ये चयापचयाचा आजार होतो. अति गंभीर परिस्थितीमध्ये जनावरांचा मृत्यू होतो. म्हणून जनावरांना शिळे अन्न देऊ नये. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, आजारामुळे जनावरांचे दूध उत्पादन घटते, फॅट कमी लागते, जनावर चारा पाणी कमी घेते. मागील पायामध्ये लंगडते, पातळ शेण टाकते, त्यामध्ये बुडबुडे, फेस काही वेळा पोट, आतड्यातील खरवडलेली त्वचा, धान्याचे कण दिसू शकतात. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

कर्मचारी झाले आता राज्यातील तहसीलदार संपावर

अनेकवेळा हा आजार तीव्र स्वरूपाचा किंवा कमी तीव्र स्वरूपात आढळतो. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये चयापचय हा आजार होतो. घातक, कोणतीही पूर्व सूचना न देता, खरी माहिती जर उपलब्ध झाली नाही तर रोगनिदानासाठी अवघड, त्यातच उपचारास विलंब झाला तर जनावरांचा मृत्यू होतो.

पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..

बदललेल्या आम्लधर्मीय वातावरणात पोटातील जिवाणू जादा आम्ल तयार करतात. त्यानंतर आम्ल शरीरात शोषले जाऊन जनावरांचा मृत्यू होतो. यामुळे याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.

उस्मानाबादी शेळीपालनाने शेतकरी होऊ शकतो श्रीमंत, जाणून घ्या काय आहे खासियत
कृषिपंपांच्या वीज दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना.
सिबिल स्कोअरची अट न लावता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, सरकारचा आदेश बँका पाळणार का?

English Summary: Feeding stale food to farmers and animals can cause death... Published on: 05 April 2023, 10:09 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters