राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एक गट म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरा गट म्हणजे एकनाथ शिंदे, असे चित्र सध्या बघायला मिळत आहे. असे असताना सध्या मातोश्रीवर अनेक शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत.
असे असताना एक धक्कादायक घटना याठिकाणी घडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे 'मातोश्री' निवसस्थानाबाहेर निधन झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते. मात्र त्यांना बरे वाटत नव्हते.
यावेळी बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे याची चर्चा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांमध्ये होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील झाली होती. त्यांना ठीक वाटत नसल्याने अचानक ही घटना घडली आहे.
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. तसेच अनेक खासदार देखील जाणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. १२ खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा दबाव पक्षातील अधिकाधिक खासदारांकडून येऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
फडणवीस की फर्नांडिस? बंडखोरांचा अनोखा प्रताप, उपमुख्यमंत्र्यांच्या नावातच केला मोठा घोळ
शेतकऱ्यांनो मुख्य पिकांसोबत कडेला ही शेती करा, व्हाल लखपती
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
Share your comments