काल महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात एक सुपर रविवार ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे आमदार फोडून अजित पवारांनी एनडीएमध्ये गेले.
यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार त्यांच्यासोबत अनेक आमदार खासदार असल्याचे सांगितले जात असताना आता पुणे जिल्ह्यातील एक खासदार माघारी फिरला आहे.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत असल्याचे म्हटले आहे. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं स्पष्ट केले आहे. 'जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। मी_साहेबांसोबत,” असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
रायगडावर शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग..
अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीट करत शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे अमोल कोल्हे यांनी जाहीर केले. यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांच्यासह सर्व नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे.
आता फक्त कालवडच जन्माला येणार! या सरकारने घेतला मोठा निर्णय..
यासंदर्भात निवडणूक आयोगाला ईमेलही पाठवण्यात आला आहे. पाटील म्हणाले की, आम्ही सभापतींना अपात्रतेची नोटीस दिली आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर ठोस कागदपत्रे सादर करू. पक्ष सोडण्याच्या निर्णयाची माहिती कोणालाही न दिल्याने नऊ नेत्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या राज्यात आता देशी गायींच्या संगोपनासाठी योगी सरकार देणार ४० हजार रुपये
एका अंड्याची कमीत चक्क १०० रुपये, जाणून घ्या काय आहे खासियत..
शेतकरी होणार मालामाल! 'या' भाजीला देशभरात आहे जोरदार मागणी, जाणून घ्या..
Share your comments