1. पशुधन

आता फक्त कालवडच जन्माला येणार! या सरकारने घेतला मोठा निर्णय..

आसाम सरकारने राज्यात मादी बछड्यांची संख्या वाढवण्यासाठी १.१६ लाख लिंग-क्रमित वीर्य खरेदी करण्याची योजना आखली आहे. आसाम सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील दूध उत्पादनालाही मदत होणार आहे. शेतीच्या जोडधंदामध्ये पशुपालन हा व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचा आहे. वाढीव दूध उत्पादन किंवा अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई किंवा म्हशीच्या गोठ्यात असणे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते.

animal husbandry (image google)

animal husbandry (image google)

आसाम सरकारने राज्यात मादी बछड्यांची संख्या वाढवण्यासाठी १.१६ लाख लिंग-क्रमित वीर्य खरेदी करण्याची योजना आखली आहे. आसाम सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील दूध उत्पादनालाही मदत होणार आहे. शेतीच्या जोडधंदामध्ये पशुपालन हा व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचा आहे. वाढीव दूध उत्पादन किंवा अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई किंवा म्हशीच्या गोठ्यात असणे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. गाईमध्ये मुख्यतः गायी विताना नर वासरू पेक्षा मादी वासरीचा कालवड जन्म व्हावा, ही प्रत्येक पशुपालकांची इच्छा असते.

अशा प्रकारची इच्छा पूर्ण करणारे तंत्रज्ञान म्हणजे लिंग निर्धारित करणाऱ्या सीमेनचा म्हणजेच सेक्स सोर्टेड तंत्रज्ञानाचा अतिशय फायदा होऊ शकतो. सध्या आपल्या भारतात सहिवाल, गिर, जर्सी, संकरित गाई, मुऱ्हा, जाफराबादी इत्यादी प्रकारच्या वळूंचा सेक्स सोर्टेड रेतमात्रा उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाविषयी खाली माहिती घेऊ या.

वैज्ञानिक कारणानुसार वळूच्या वीर्यामध्ये एक्स आणि वाय या दोन प्रकारचे गुणसूत्र असणारे शुक्राणू आढळतात. याउलट मादी पशूमध्ये स्त्री बीजात एक्स एक्स प्रकारच्या गुणसूत्रांच्या प्रमाण असते. जेव्हा गर्भधारणेच्या कालावधीत वळूच्या विर्या यांमधील एक्स गुणसूत्र स्त्री बीजातील एक्स गुणसूत्र सोबत जुळते, तेव्हा कालवड जन्मास येतात त्याचप्रमाणे वाय गुणसूत्र असलेले शुक्राणू स्त्री बीजातील एक्स गुणसूत्र सोबत मिळते त्यापासून नर वासरू जन्माला येते.

शेतकऱ्यांसह पशुखाद्य उत्पादक कंपनीचा समितीत समावेश, आता तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडणार का?

उच्च अनुवंशिकता असलेल्या वळूपासून प्राप्त झालेल्या वीर्यातील एक्स आणि वाय गुणसूत्रे असलेले शुक्राणू वेगळी करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उच्च गुणवत्ता, अनुवंशिकता आणि उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी जन्मास आणणे सेक्ससोर्टेड सिमेन्सच्या तंत्रज्ञान वापरामुळे शक्य झाले आहे त्यामुळे दुग्धव्यवसायात दूध उत्पादन वाढविण्यात मदत झाली आहे.

गाय किंवा म्हैस विताना प्रसूतीच्या वेळेस वेदना होतात त्याला कष्ट प्रसूती म्हणता येईल, नर वासरांचा बांधा हा मादी वासरांच्या बांध्यापेक्षा तुलनेने जास्त असतो. त्यामुळे प्रसूती अधिक कष्टदायक होते. परंतु सेक्स सोर्टेड सीमेनचा वापर करून मादी वासरू ना जन्मास आणण्यात येते. नर वळूंच्या तुलनेत मादी वासरांच्या आकार छोटा असतो म्हणून कष्ट प्रसूतीची शक्यता कमीत कमी असते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, शिंदे सरकारचा निर्णय...

सेक्स सोर्टेड सीमेनचा वापर केल्यानंतर मादी वासरांचा जन्म जास्त प्रमाणात होतो त्यामुळे मादी वासरांची संख्या वाढून दुधाळ पिढी गोठ्यातच तयार होते.पशुपालन का जवळ दूध देणाऱ्या गाई मिळाल्यामुळे वाडिव दुग्धोत्पादन यामुळे आर्थिक प्रगतीत कमालीची सुधारणा होते. सेक्स सोर्टेड सीमेनचा वापर करून जर नर वासरे जन्माला आणली तर त्यांची विक्री आपण नर वळू संगोपन केंद्र किंवा रेत प्रयोगशाळा यांना करू शकतो.

कारण ते या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उच्च गुणवत्ता व अनुवंशिकता असलेले वासरू असतात. त्यापासून पशुपालकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. सेक्स सोर्टेड सीमेन मात्र याची किंमत सरासरी बाराशे ते सतराशे रुपये इतकी आहे. या तंत्रज्ञानामुळे आपल्याला नर वासरू जन्माला आणायचे किंवा मादी वासरू जन्माला आणायचे हे आपल्यावर अवलंबून असते. त्यामुळे पशुपालकांनी जर या तंत्रज्ञानाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो, व अधिकच्या मादी पासूनच्या जन्मामुळे दुग्धोत्पादनात वाढ होऊ शकते.

रायगडावर शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग..
जगातील सगळ्यात महागडी गाय भारताची, किंमत १४ लाख ४० हजार डॉलर...
शेतकऱ्यांसह पशुखाद्य उत्पादक कंपनीचा समितीत समावेश, आता तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडणार का?

English Summary: Now only Kalavad will be born! This government has taken a big decision.. Published on: 03 July 2023, 11:01 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters