स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी उघड केली आहे. मागच्या काही काळापासून रविकांत तुपकर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. ते पक्ष देखील बदलतील इथपर्यंत चर्चे सुरू झाली होती.
अशातच तुपकरांनी काल कार्यकर्ता मेळावा घेत 'स्वाभिमानी'मधील काही वरिष्ठांवर थेट नाराजीचा सूर व्यक्त केला. यामुळे ही चर्चा अजूनच वाढली आहे. यामुळे येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यास ते म्हणाले की, रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी युवा आघाडी विदर्भचे प्रशांत डिक्कर यांच्यातील तो अंतर्गत वाद आहे.
यातून संघटनेला किंवा चळवळीला तडा जाईल असे काही नाही. आम्ही राज्य कार्यकारणीची पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन दोघांनाही बोलवून घेत योग्य मार्ग काढणार असल्याची त्यांनी सांगितले.
यामुळे आता काय मार्ग निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच तुपकर हे बुलडाणा लोकसभा मतदार संघातून तयारी करत आहेत ते स्वाभिमानीचे लोकसभेचे उमेदवारही असतील असे राजू शेट्टी म्हणाले.
पुणे बाजार समितीला आली जाग, ९३ अडत्यांवर कारवाई, लाखांचा दंड वसूल...
मी रविकांत तुपकर यांच्या सभा किंवा मोर्चे असतील तर जात असतो. डिक्कर यांच्याही सभांना जात असतो परंतु यातून गैरसमज होईल असे काही नाही, असेही ते म्हणाले.
Share your comments