गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी झालेला कोरोना आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. असे असताना आता रोज हजारच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. तसेच अनेकांचे जीव देखील जात आहेत. राज्यात मास्कची सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती पाहून पुन्हा मास्कसक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शाळा सुरु होणार की नाही, याकडे देखील पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात काही शाळा या 13 जूनपासून सुरु होत आहेत. याबाबत आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत काय निर्णय, राज्य सरकार घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, शाळा सुरु होण्याआधी पुन्हा नवी नियमावली करण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. तसे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबत त्या म्हणाल्या, शाळांबाबत एसओपी तयार करणार आहोत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. काळजी घेऊन शाळा सुरु करणार आहोत. त्यामुळे शाळा सुरु करताना नवी नियमावली असणार हे आता नक्की झाले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा नव्या नियमानुसार सुरु करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'गडकरींचे भाषण ऐकून मला वाटले की साखर कारखाना काढावा, पण मी काढणार नाही कारण...'
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत अनेक मुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे याचा फटका अनेकांना बसला, तसेच शाळेची फी तर भरावीच लागत आहे. यामुळे आता पालक देखील याबाबत विचारणा करत आहेत. यामुळे आता यावर्षी तरी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी कोरोना वाढला तर मुलांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो पिकलेल्या शेतमालावर विक्री आधीच घ्या कोट्यावधींचे कर्ज अन् शेतीमालही सुरक्षित
अतिरिक्त उसाबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, पुण्यात साखर परिषदेचे आयोजन
पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा करणे
Share your comments