1. बातम्या

भाईजान सलमान आणि धमेंद्र यांच्यामुळे महाराष्ट्र कृषी पर्यटनाला आली गती, वाढला शेतीकडे लोकांचा ओढा

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारताची बहुतांशी अर्थव्यवस्था ही कृषी-आधारित आहे. परंतु वर्षानुवर्षे भारतीय शेतकरी हा परंपरागत शेती करत होता. परंतु कालांतराने म्हणजेच साधारणतः हरितक्रांतीच्या नंतर शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती होत गेली. तसतसे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत गेलो. त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांनी शेतामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्वप्नवत वाटावी अशी प्रगती साधली. शेतामध्ये कालांतराने वेगवेगळ्या संकल्पना येत गेल्या.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
महाराष्ट्र कृषी पर्यटन

महाराष्ट्र कृषी पर्यटन

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारताची बहुतांशी अर्थव्यवस्था ही कृषी-आधारित आहे. परंतु वर्षानुवर्षे भारतीय शेतकरी हा परंपरागत शेती करत होता. परंतु कालांतराने म्हणजेच साधारणतः हरितक्रांतीच्या नंतर शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती होत गेली. तसतसे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत गेलो.

त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांनी शेतामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्वप्नवत वाटावी अशी प्रगती साधली. शेतामध्ये कालांतराने वेगवेगळ्या संकल्पना येत गेल्या. आता तर बहुतेक शेतामध्ये स्वयंचलित पद्धतीने शेती करण्याइतपत तंत्रज्ञान पोहोचले आहे.अशा संकल्पना पैकी एक म्हणजे कृषी पर्यटन. आता पर्यटन म्हटले म्हणजे आपल्या घरापासून, दररोजच्या धकाधकीच्या जीवनापासून आणि शहरात असलेल्या कोलाहल यापासून मानसिक शांतता मिळावी त्याबरोबरच काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात निवांत पणे घालवता यावे या संकल्पनेतून कृषी पर्यटनाचा जन्म झाला. कृषी पर्यटन विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत अमुलाग्र बदल होत आहे. तसं पाहिलं तर कृषी पर्यटन ही संकल्पना फारच व्यापक आहे. परंतु  पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजून कृषी पर्यटनाचा विकास होताना दिसत नाहीये. परंतु टप्प्याटप्प्याने आता कृषी पर्यटनाने विकासाच्या दिशेने वेग धरला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपण थोडक्यात कृषी पर्यटन या संकल्पनेची पार्श्वभूमी पाहू.

हेही वाचा : कृषी पर्यटन शेतकऱ्यांसाठी एक चांगली व्यावसायिक संधी

सोळा वर्षापुर्वी पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाचा प्रायोगिक तत्त्वावर चा प्रकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती मध्ये सुरू केला.त्यानंतर पुढील दोन वर्षात तेथे त्यांनी कृषी पर्यटन प्रशिक्षण आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. या क्षेत्रामध्ये तावरे यांच्या कृषी पर्यटन विकास निगमने फार चांगले काम केले. कालांतराने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल क्रेज तयार झाल्यावर या व्यवसायाचा चेहरामोहराच बदलून गेला. जरा सध्या चा विचार केला तर 29 जिल्ह्यात 328 कृषी पर्यटन केंद्रे सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात प्रगती पावत असलेल्या या क्षेत्रात  असलेल्या शेतकर्‍यांच्या कमाई मध्ये जवळजवळ पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्या वर्षात यातून 56 कोटींची कमाई केली गेलेच आकडेवारी सांगते.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसर हा भौगोलिक दृष्ट्या निसर्गाने नटलेला आहे. या क्षेत्रामध्ये वर्षभर पर्यटन करता येते. यामध्ये निसर्गसुंदर अशा कोकणामध्ये परदेशातून देखील पर्यटक हजेरी लावत असतात.तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक रिसॉर्ट व पर्यटन केंद्रे लोकांना आकर्षित करत असतात.महाराष्ट्राने नेहमीच कृषी पर्यटनावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्र पर्यटन निदेशालय  चे निर्देशक डॉ. धनंजय सावळकर याबाबत ते सांगतात की, कृषी पर्यटन ही संकल्पना देशांमध्ये फार वेगाने विकसित होत आहे. यामुळे ग्रामीण विकासाला चांगला हातभार लागत आहे. यामध्ये शेती आणि त्यासंबंधी येणारे  पर्यटन हे नाते निर्माण होत आहे ते गावागावांमध्ये आर्थिक विकासाची संधी घेऊन येत आहे.

salman khan

salman khan

कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये बॉलीवूड ही मागे नाही. बॉलीवूड मधील दोन प्रसिद्ध  चेहरे एक म्हणजे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि जुन्या काळातील ही-मॅन धर्मेंद्र कृषी पर्यटनामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. मागच्या वर्षी कोरोना काळामध्ये दबंग अभिनेते सलमान खान यांचे शेतामध्ये भात शेतीतले तसेच चिखलामध्ये भात शेती तयार करतानाचे ट्रॅक्टर वरचे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल  झाले होते. सलमान खान यांचे पनवेल जवळ मोठे फार्म हाऊस आहे. तिथले बरेचसे फोटो आणि व्हिडीओ सलमान खान सोशल मीडियावर टाकत असतात. तसेच  धर्मेंद्र  हे देखील त्यांच्या शेतातले काम करतानाचे आणि शेतातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

 

अशा पद्धतीने बॉलिवूड कलाकारांच्या प्रसिद्धीचा फायदा कोणाला कसा होईल हे अजिबात  सांगता येणार नाही. या बॉलीवूड मधील दोघा कलाकारांचा हातभार नकळत का होईना पण महाराष्ट्रातील कृषी पर्यटन विकासाला निश्चितच लागला असून कोरोना काळातसुद्धा कृषी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना करोडची कमाई केली असल्याचे समजते. याचा फायदा असा झाला की गतवर्षी कोरोना काळातसुद्धा आठ लाखांहून अधिक पर्यटकांनी कृषी पर्यटनाचा आनंद लुटला. तसे शासनाकडूनही कृषी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी साहाय्य केले जाते. शासनाकडून या व्यवसायाला चालना देण्यासाठी  कर्ज सुविधा पुरविली जाते.. यासाठी कर्जाचा अर्ज कसा सादर करावा ते पाहू.

 

कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्जाचा अर्ज सादर करताना ज्यासाठी कर्ज घ्यायचे आहे या बाबत संपूर्ण माहिती दिली पाहिजे. प्रकल्प अहवाल नेमका, वास्तव व पारदर्शक असावा. प्रकल्प अहवाल बनवून देणारे असतो याची परिपूर्ण माहिती आवश्यक आहे.  संबंधित प्रकल्प अहवालामध्ये मार्जिन स्वनिधी, बँकेचे सहाय्य, व्याजदर, कर्ज परतफेडीचा कालावधी, येणारा व जाणारा पैसा यांचा समन्वय, प्रतिवर्षी होणारी वाढ, परतफेडीचा तपशील इत्यादी बाबींचा समावेश असावा.

     कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • राहण्याचा दाखला व फोटो दाखला
  • ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला
  • अंदाजपत्रक
  • ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना
  • आर्किटेक्चर दाखला
  • ज्या ठिकाणी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एन ए किंवा झोन दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. त्याबरोबरच जागेविषयी  संपूर्ण कागदपत्र, वकील तारण योग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट
  • ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांचे संमती पत्र
  • जागेचा नकाशा तसेच अन्य गट धारकांची संमती
  • कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संमती पत्र
  • जोड तारण असल्यास जोडताना ची कागदपत्रे
  • आर्थिक कागदपत्रे
  • आवश्यक प्रमाणपत्रे तसेच जा मीनदारांचे कागदपत्रे. विशेष म्हणजे जमीनदार हा कर्जदाराला इतकाच खर्च परत फेडीला जबाबदार असतो.

 

कृषी पर्यटन हा व्यवसाय असल्याने व्याजदर हा 13 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत अपेक्षित असतो.  मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी हा कर्ज नुसार पाच ते दहा वर्षांपर्यंत असू शकतो.  कर्जाचा हप्ता हा मासिक, त्री मासिक किंवा  वार्षिक असतो. विशेष म्हणजे संबंधित कर्ज परत फेड बाबत ड्राय पिरियड मंजूर होऊ शकतो. पिरियड मध्ये फक्त दरमहा व्याज भरावे लागते.

 

English Summary: Salman Khan and Dhamendra have given impetus to Maharashtra agri-tourism Published on: 15 May 2021, 02:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters