1. बातम्या

कृषी पर्यटन शेतकऱ्यांसाठी एक चांगली व्यावसायिक संधी

जर आपण कृषी पर्यटन या संकल्पनेचा विचार केला तर यामध्ये कृषी व पर्यटन या दोन भागांचा समन्वय हा दिसून येतो. या संकल्पनेमध्ये शेती पर्यटक शेतांना भेट देतील, शेतीचे विविध अंगे व पैलूचे दर्शन वा अनुभव घेतील, आणि शहरा कडचा कोलाहल आणि प्रदूषण मुक्त वातावरणाचा तसेच ताजा फळे व भाजीपाला खरेदी करू शकतील, तसेच ग्रामीण भागातील आहार पद्धती तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपारिक लोककलांचा अनुभव आनंद घेऊ शकतील. तसेच पुन्हा ताजेतवाने होऊन आपल्या शहराकडे जाऊ शकतील.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
agri-tourism center

agri-tourism center

 जर आपण कृषी पर्यटन या संकल्पनेचा विचार केला तर यामध्ये कृषी व पर्यटन या दोन भागांचा समन्वय हा दिसून येतो. या संकल्पनेमध्ये शेती पर्यटक शेतांना भेट देतील, शेतीचे विविध अंगे व पैलूचे दर्शन वा अनुभव घेतील, आणि शहरा  कडचा कोलाहल आणि प्रदूषण मुक्त वातावरणाचा  तसेच ताजा फळे व भाजीपाला खरेदी करू शकतील.

तसेच ग्रामीण भागातील आहार पद्धती तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक  आणि पारंपारिक लोककलांचा अनुभव आनंद घेऊ शकतील. तसेच पुन्हा ताजेतवाने होऊन आपल्या शहराकडे जाऊ शकतील. या संकल्पनेच्या आधारावर ग्रामीण भागातील माणूस हा शहराशी जोडला जाईल. तसेच शहरातील मुलांना आपले मामाचे घर  मिळेल. तसेच शहरातील पैसा हा ग्रामीण भागात आल्याने आपले गाव निश्चित स्वयंपूर्ण होईल.

शहरी लोकांना ग्रामीण जीवनाची संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या व्यापक दृष्टिकोन त्यामागे आहे. शेती आणि पर्यटन या दोन संकल्पना जोडणारा दुवा म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. शहरामध्ये  घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या लोकांना थोडे विरंगुळ्याचे चार क्षण मिळावे तसेच या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील याच दृष्टिकोनातून कृषी पर्यटनाला खूप महत्व आहे. या लेखामध्ये आपण कृषी पर्यटन विषयी माहिती घेऊ.

 कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीतील  प्रमुख घटक

 कृषी पर्यटनाचा आत्मा म्हणजे अशी एक जागा जिथे पर्यटक शेतांना भेट देतात शेतातील विविध पैलूंचा अनुभव घेतात, शेतात पिकणाऱ्या ताजा भाजीपाला फळे, तसेच कृषिपूरक व्यवसायातून निर्मित वस्तू विकत घेऊ शकतात, तसेच ग्रामीण भागातील लोकसंस्कृती, लोकांचे जीवन आणि खाद्यसंस्कृती, परंपरा इत्यादींचा अनुभव घेता येतो. साधारणता कृषी पर्यटन हा व्यवसाय वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकार संस्था, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांनी तयार केलेले भागीदारी संस्था किंवा कंपन्या, ग्रामपंचायत, शेतकऱ्यांचे गट यापैकी कुणीही सुरू करू शकतो.

 ज्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचे  असेल असं ठिकाण शहरापासून लांब असायला पाहिजे.. तसेच नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असावे. पर्यटकांना निराळ्या अनुभवविश्वात घेऊन जाण्याची शक्यता किती असला पाहिजे. येथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाने केलेली भांडवली गुंतवणूक येथे कामात येते ती म्हणजे पाणवठे, शेती, जंगले, पर्वत राई, नद्या इत्यादी. या सगळ्या नैसर्गिक खजिन्याची ओळख करून देणारा हा शिक्षकच असतो जणू त्यामुळे शेतकऱ्याकडे नुसतेच येत असून चालत नाही तर त्याला त्याच्या भोवतालची, सध्या नैसर्गिक जैवविविधतेची परिपूर्ण माहिती असायला हवी. आपल्या खेड्याचा  इतिहास, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, आजूबाजूचे जंगल नद्या-नाले यांच्याबरोबर शेतीची अवजारे, लागवडीच्या पद्धती, लागवडीचे तंत्रज्ञान, ग्रामीण भागातील विविध खेळ, शेती पूरक व्यवसाय हस्तकला यांची पुरेशी माहिती असली पाहिजे. आणि या सगळ्यात ग्रामीण विश्वाचा अनुभव येणाऱ्या पर्यटकांना मिळावा  अशी अपेक्षा असेल तर त्याची माहिती  कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवीच  हवी.

हेही वाचा : कांदा प्रक्रिया उद्योग; नाशवंत पदार्थापासून शेतकरी बनवू शकतील पैसा, वाचा कमाईची नवी कल्पना

तसेच आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव! याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे घरचा सदस्य प्रमाणे आदरातिथ्य केले म्हणजे आपण अर्धी लढाई इथेच जिंकतो. तसेच हा व्यवसाय सुरू करताना सर्व बाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. त्याच सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे मार्केटिंग करणे हे महत्त्वाचे ठरते. आपल्या व्यवसायाची जाहिरात, वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पर्यटन विषयक मासिके यातून सतत करावी.  आपल्या शेतीची बलस्थाने आपण विकसित केली पाहिजेत. नाविन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्त्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी.

 

पर्यटकांसोबत स्वतः जातीने उपस्थित राहावे. विश्वासाचे नाते नवीन पर्यटक तुमच्याशी जोडले जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे या गोष्टींची खूप काळजी घ्यायला हवी. राहण्याची व खाण्याची योग्य व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा भेट नक्की देणार याची खात्री असते. आठवड्याची सुट्टी ही वाढती संकल्पना पाहता पर्यटकांना आपल्या केंद्राकडे वळवता येऊ शकते.

 कृषी पर्यटन केंद्रासाठी कर्जाचा अर्ज कसा सादर करावा

कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्जाचा अर्ज सादर करताना ज्यासाठी  कर्ज घ्यायचे आहे, त्या बाबत संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. प्रकल्प अहवाल नेमका, वास्तव व पारदर्शक असावा. प्रकल्प अहवाल बनवून देणारे असते याची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. संबंधित अहवालामध्ये मार्जिन स्वनिधी, बँकेचे सहाय्य, व्याजदर, कर्ज परतफेडीचा कालावधी, येणारा व जाणारा पैसा यांचा समन्वय, प्रतिवर्षी होणारी वाढ, परतफेडीचा तपशील इत्यादी बाबींचा समावेश असावा.

 कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • राहण्याचा दाखला व फोटो दाखला

  • ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला

  • ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना

  • अंदाज पत्रक

  • आर्किटेक्चर दाखला

  • ज्या ठिकाणी बांधकाम करायचे या क्षेत्राचा एन ए ( कलेक्टर ) किंवा झोन दाखला इत्यादी कागदपत्र आवश्यक   असतात. त्याबरोबरच जागेविषयी  संपूर्ण कागदपत्रे, वकील तारण योग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट

  • ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्या संमती पत्रक

  • जागेचा नकाशा तसेच अन्य गट धारकांची संमती

  • कुटुंबातील अन्य सदस्यांचे संमती पत्र

  • जोड तारण असल्यास जोड तारणाची कागदपत्रे

  • आर्थिक  कागदपत्रे

  • आवश्यक  प्रमाणपत्रे तसेच जा मीनदारांचे  कागदपत्रे. विशेष म्हणजे जामीनदार हा कर्जदाराला इतकाच कर्ज परतफेड  ला जबाबदार असतो.

कृषी पर्यटन हा व्यवसाय असल्याने व्याजदर हा 13 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत अपेक्षित असतो. मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी हा कर्ज नुसार  पाच ते दहा वर्षापर्यंत असा असू शकतो. कर्जाचा हप्ता हा मासिक, त्री मासिक किंवा वार्षिक असतो. संबंधित कर्ज परत फेड बाबत ड्राय पिरियड मंजूर होऊ शकतो. या कालावधीत फक्त दरमहा व्याज भरावे लागते. कर्ज विनियोगाची स्वतंत्र तपशीलवार पत्र देणे गरजेचे आहे.

 कोणत्या गोष्टीसाठी कर्ज मिळू शकते

 जमीन सपाटीकरण, अॅप्रोच रोड, तलाव, शेततळी उभारणे,पाण्याची टाकी, पाईप लाईन, कॉटेज, रूम  बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडा गाडी,, पर्यटकांना फिरण्यासाठी वाहन खरेदी, सौर ऊर्जा, गोबर गॅस दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, माला तारण कर्ज इत्यादी. जर आपण कृषी पर्यटनाकडे गावचे दृष्टीने पाहिले तर चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती करता येईल. आजकालच्या काळात धकाधकीच्या जीवनात परस्परांमधील संवाद हा कमी होतोय. त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे.

पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदित होतात.त्यासाठी आपले काम आहे की आपण त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरवल्या पाहिजेत. कृषी पर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा असेल तर उत्तम. शेतीतून अधिक उत्पन्न वाढविण्याचे संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर भरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना प्रयोग करून कृषी पर्यटन यशस्वीरित्या राबवत आहेत. शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकऱ्याने कृषी पर्यटनासाठी सुरुवात करायला हवी

कृषी पर्यटनासाठी शासनाकडून मिळणारी लाभ

  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन धोरण 2016 मधील प्रोत्साहन योजना राज्य वस्तू व सेवा करा मध्ये व विद्युत शुल्कामध्ये सवलतलागू राहील.

  • कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.

  • कृषी पर्यटन केंद्र मालकास नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज घेता येऊ शकेल.

  • जलसंधारण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या पाणलोट आधारित योजना,शेततळे यासारख्या योजनांसाठी कृषी पर्यटन केंद्रात प्राधान्य देण्यात येईल.

  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रींहाऊस, फळबागआणि भाजीपाला लागवड इत्यादींसारखे योजना उपलब्ध करून दिल्या जातील.

  • पर्यटन धोरण 2016 प्रमाणे आठ खोल्या पर्यंतच्या केंद्रासाठी खोड्या आणि सुविधांच्या बांधकामासाठी नगररचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. आठ पेक्षा जास्त खोल्या असलेली केंद्रीय व्यावसायिक उपक्रम म्हणून ओळखली जातील आणि त्यासाठी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक असेल.

  • प्रशिक्षण व मार्गदर्शन अनुभवी प्रक्षिक्षण मार्फत कृषी पर्यटन केंद्र चालकांना प्रशिक्षण

  • खाजगी शासकीय विपणन व्यवस्था तसेच ऑनलाइन मार्केटिंगचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.

कृषी पर्यटन उद्योगापुढील साधारणतः आव्हाने

  • कृषी पर्यटनाच्या शास्त्रीय माहितीचा अभाव

  • व्यवस्थित धोरण नसल्याने बँकांकडून वित्तीय योजना नाहीत. परिणामी केंद्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवलाची कमतरता ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे.

  • तसेच कृषी पर्यटनाविषयी जागृती हवी ती अजूनही शेतकरी आणि पर्यटकांमध्ये पाहिजे तेवढी नाही

  • तसेच संघटनात्मक गोष्टींचा अभाव आहे.

 

 

English Summary: Agri-tourism is a great business opportunity for farmers Published on: 15 May 2021, 09:38 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters