1. बातम्या

रायझोबियम युरियाला पर्याय

रायझोबियम हा एक जीवाणू असून तो वातावरणातील नत्र सहजीवी पध्दतीने मुळावरील गाठीमध्ये स्थिर करतो, हे स्थिर नत्र पिकांना सहज उपलब्ध होते. हे जीवाणू फक्त शेंगवर्गिय/ व्दिदल पिकांसाठी उपयोगी पडते. परंतु वेगवेगळया पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत वापरावे लागते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

रायझोबियम हा एक जीवाणू असून तो वातावरणातील नत्र सहजीवी पध्दतीने मुळावरील गाठीमध्ये स्थिर करतो, हे स्थिर नत्र पिकांना सहज उपलब्ध होते. हे जीवाणू फक्त शेंगवर्गिय/ व्दिदल पिकांसाठी उपयोगी पडते. परंतु वेगवेगळया पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत वापरावे लागते.

मागचा वर्षी जुन अखेर विदर्भातील आमचे शेतकरी हे त्यांचा २५ एकर क्षेत्रावर सोयाबीन ची लागण करायचे ठरवले. लागण झाली उगवण ही चांगली झाली. साधारण ऑगस्ट अखेर त्यांनी त्यांचा पिकाला रायझोबियम ची मागणी केली. २५ एकर क्षेत्राला जिवाणू खत वापरणे ते ही पीक वाढीचा अवस्थेत असताना थोडे अवघड जाते. आम्ही त्यांना रायझोबियम चा व्यतिरिक्त पी. एस.बी(स्फुरद विरघवणारे जिवाणू) आणि के.एम.बी(पालाश उपलब्ध करणारे जिवाणू) हे ही वापरण्यास दिले. ह्याचा वापर होण्यासाठी आम्ही १टन लाकडी भुस्याचा वापर केला आणि हे सर्व जिवाणू हे त्या लाकडी भुस्यमध्ये मिसळले. हा भुस्सा आम्ही त्यांचा २५ एकर क्षेत्रावर विस्कटुन घेतला.

ऐन पावसात आम्ही ते खत विस्कटुन घेतले जेणेकरून जिवाणूंचे परिणाम लवकर मिळतील. जिवाणूंचा परिणाम हे १०दिवसानंतर जाणवू लागला. झाडांची वाढ आणि काळोखी ह्या दोन्ही घटकांमध्ये सुधारणा झाली होती. पानाचा काळोखी मध्ये वृद्धी ह्याचा अर्थ पानांची प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमता ही वाढली. जेवढं जास्त प्रकाशसंश्लेषण होणार तेवढी जास्त साखर खोडामध्ये साठणार. जेवढी जास्त साखर खोडामध्ये साठणार तेवढं चांगले दाणे भरणार आणि उत्पादन वाढणार. ह्या सगळ्याच फायदा असा झाला की शेतकरी जो दर वर्षी एकरी ₹१०००/- खर्च करत होता तो ह्या वेळी फक्त एकरी ₹२००/- मध्ये तेवढंच उत्पादन आले. त्या शेतकऱ्याला एकरी ७ क्विंटल ते १२ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले.

 

पूर्वीही तेवढंच उत्पादन येत होते आताही तेवढंच उत्पादन येते फक्त उत्पादनखर्च हा ५ पटीने कमी आला. कुठल्याही धंद्यात कवडी वाचली की कवडी कमावली असा समज असतो. ह्या सर्व पध्दतीमध्ये जमिनीचा पोत सुधारला. झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढली. उत्पादन खर्च ५ पटीने कमी झाला. आम्ही आमचा शेतात कुठलेही खत न घालता आधी एवढे उत्पादन घेतो. रायझोबियम हा जिवाणू मुळीवर राहून नत्र स्थिर करण्याचे काम करतो. रायझोबियम चा वापरा मुळे भुईमूग किंवा इतर तेलबिया ह्यांच्यात तेलाचे प्रमाण वाढते. त्यामुळे उत्पादनही वाढते.

हरभरा ,तूर ,वाटाणे,तीळ,मोहरी,जवस आणि इतर द्विदल पिकांमध्ये नत्र स्थिर करण्याची क्षमता ह्या जिवाणू मध्ये आहे. झाडांमध्ये संप्रेरक तयार करण्यास ही रायझोबियम मदद करते. सायटोकायनिन, ऑक्सिन,जिब्रेलीन, एबीसीसीक ऍसिड निर्मित मध्ये ही रायझोबियम मदद करते. आता पर्यंत आपण ह्या जिवाणूचा वापर हा फक्त बेणेप्रक्रिये साठी करायचो. आपण नकळत त्याचा क्षमतेवर मर्यादा आणतोय. युरिया ला हा जिवाणू एक उत्तम पर्याय आहे असे ह्या प्रयोगाअंती स्पष्ट सांगता येईल.


शिफारस केलेली पिके

  • ताग, अ) सोयाबीन गट सोयाबीन पिक (रायझोबियम जापोनिकम) ब) चवळी गट चवळी, भुईमुग, तूर, उडीद, मुग, गवार, इत्यादी (रायझोबियम स्पे)

  • क) हरभरा गट हरभरा (रायझोबियम सायसरी)

  • वापरण्याची पध्दत

  • बीज प्रक्रिया १०० मिली प्रती १० किलो बियाण्यासाठी.

  • ठिबक सिंचनाव्दारे १ ते २ लिटर प्रती एकर क्षेत्रासाठी. पुर्नलागवड (रोपे बुडविणे) ५०० मिली प्रती एकर.

  • जमीनीत देण्यासाठी २ लिटर द्रवरुप जीवाणू खत ५० किलो शेणखतात.

  • मिसळून सम प्रमाणात टाकावे.

 

फायदे

  • पिकांना नत्राची उपलब्धता करून देतात.

  • बियाण्याची उगवणशक्तीमध्ये वाढ होते.

  • झाडांची मुळे जोमाने वाढत

  • रासायनिक खताची मात्रा कमी करण्यास मदत होते.

  • पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

  • पिकांची जमिनीतील अन्नद्रव्य खेचून घेण्याची क्षमता वाढते.

  • पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.

लेखक - विजय भुतेकर चिखली, बुलढाणा
प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Rhizobium ureala Synonyms Published on: 26 August 2021, 07:18 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters